आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व शिक्षाच्या घोटाळ्याची पोलिसांमार्फत चौकशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पुस्तकांची छपाई करताच १३ लाखांची देयके काढण्यात आलेल्या प्रकरणाची तक्रार झाल्यानंतर न्यायालयाने सिटी कोतवाली पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी कसून चौकशी केल्यास प्रकरणातील सत्यता बाहेर येण्याची शक्यता आहे.
शिर्ला अंधारे येथील पांडुरंग तुळशीराम वरणकार यांनी पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सिटी कोतवाली पोलिसांमार्फत या प्रकरणाची चौकशी होणार आहे. वाचन लेखन पुस्तिकांच्या छपाईची ऑर्डर जर ऑक्टोबर २०१३ रोजी दिल्या जात असेल, तर २४ सप्टेंबर २०१३ रोजी माल कसा भेटू शकताे. त्याच दिवशी त्या पुस्तकांचे वाटप कसे करता येऊ शकते, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला असून, पोलिस या प्रकरणात काय तपास करतात याकडे लक्ष लागले आहे.

सन २०१३ मध्ये सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रशिक्षणासाठी वाचन लेखन पुस्तिका छपाई करण्यात आल्या होत्या. या प्रकरणाची तक्रार अमरावती विभागीय आयुक्तांकडे झाल्यानंतर चमूने चौकशी केली. त्यात सर्व शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यासह जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी दोषी आढळले आहेत. चौकशी समितीने संबंधित अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडेसुद्धा आहे.

स्थायीसमिती सभेत प्रकरण उघडकीस : ३०मार्च रोजी स्थायी समितीच्या सभेत जिल्हा परिषद सदस्या शोभाताई शेळके यांनी हे प्रकरण उघडकीस अाणले होते. सर्व शिक्षा अभियानातील मार्च रोजी कोणत्या प्रकरणाची विभागीय चौकशी झाली याबाबत माहिती विचारली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर हे तुम्हाला एक दोन दिवसांत माहिती देतील, असे सांगितले होते. दरम्यान, यात सर्व शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यासह जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी दोषी आढळले आहेत.

‘त्या’ महिलेला पुनर्नियुक्ती देऊ नका
सर्वशिक्षा अभियानातील कर्मचारी सुवर्णा नाईक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्या शोभाताई शेळके यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एप्रिल रोजी केली आहे. सुवर्णा नाईक यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्याचे सांगून अशा महिलेला पुनर्नियुक्ती देऊ नका, अशी सूचना केली आहे. दरम्यान, अाता प्रकरण पाेलिसांकडे गेल्यामुळे खरे सत्य बाहेर येणार अाहे.