आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्याची संस्कृती बुद्धिबळात देशात प्रथम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुद्धिबळपटू संस्कृती वानखडेने देशात प्रथम स्थान पटकावल्याबद्दल तिचा ब्रिलियंट अॅकेडमीतर्फे सत्कार करण्यात आला. - Divya Marathi
बुद्धिबळपटू संस्कृती वानखडेने देशात प्रथम स्थान पटकावल्याबद्दल तिचा ब्रिलियंट अॅकेडमीतर्फे सत्कार करण्यात आला.
अकोला - नाशिक येथे झालेल्या ऑल इंडिया ओपन फिडे रेटिंग चेस टुर्नामेंटमध्ये येथील ब्रिलियंट चेस अॅकेडमीच्या संस्कृती वानखडेने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत वर्षांआतील गटात देशात प्रथम स्थान पटकावले.
संस्कृती वानखेडे हिची आंतरराष्ट्रीय रेटिंग २७ पॉइंटने वाढली आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील ३१८ बुद्धिबळपटूंचा समावेश होता. त्यामध्ये १८१ हे आंतरराष्ट्रीय फिडे मानांकित खेळाडू होते. तिला ग्रँडमास्टर विदित गुजराती यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. तिच्या यशाबद्दल ब्रिलियंट चेस अॅकेडमीच्या वतीने सत्कार करण्यात आला. तिला आरुषी अग्रवाल, मिष्ठी अग्रवाल यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. या वेळी मनाली कुळकर्णी, प्राची कागलीवार, प्रणव कागलीवार, मयंक टावरी, कृष्णा सारडा, प्रवल उमाळे, विनीत चांडक, शर्व कोलवाडकर, आरव अग्रवाल, वैद्य ठाकरे, अदी शहा, सोहम भुतडा, नयन इंगळे, विवान दालमिया, साहील कुळकर्णी, श्रेया अग्रवाल आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षक जितेंद्र अग्रवाल यांनी केले.