आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात सर्व पोलिस स्टेशन झाले ऑनलाईन, संगणकाद्वारे एफआयआर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला : पोलिस स्थापना दिनाचे औचित्य साधून पोलिस ठाणे ऑनलाइन करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता २३ पैकी २० पोलिस ठाण्यात संगणकाद्वारे तक्रारदारांना एफआयआर मिळत आहेत. 
 
मंगळवारी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणी ऑनलाइन झाली आहेत. क्राइम क्रिमिनल ट्रॅकर नॅशनल सिस्टिमच्या (सीसीटीएनएस ) माध्यमातून गृह विभागाने विप्रो कंपनीच्या सहकार्याने राज्यातील सर्व पोलिस ठाणी ऑनलाइन करण्याचा उपक्रम हाती घेतला.
 
१९९८ ते २०१३ पर्यंतचे सर्व एफआयआर आणि तपासाची सर्व माहिती संगणकात अपलोड करण्याचे काम राज्यभर सुरू आहे. विभागातून ऑनलाइन होण्याचा मान अकोला जिल्ह्याने पटकावला आहे. जिल्ह्यातील नव्याने निर्माण झालेल्या तीन पोलिस ठाण्यात डाटा फीडिंगचे काम अंतिम टप्प्यात आहे. पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र एक करून डाटा अपलोड करण्याचे काम पूर्ण केले आहे. 
 
तीन पोलिस ठाण्यांचे काम अंतिम टप्प्यात 
- मुर्तिजापूर ग्रामीण,जुने शहर एमआयडीसी पोलिस ठाणे नव्याने कार्यान्वित झाले आहेत. या पोलिस ठाण्यात सीसीटीएनएसचे काम अंतिम टप्प्यात आहे. ऑनलाइन तक्रारीची नोंद झाल्यानंतर तक्रारदाराला एसएमएस जातो त्याला ऑनलाइन एफआयआरची प्रत देण्यात येत आहे.
-विजयकांतसागर, अप्पर पोलिस अधीक्षक 
बातम्या आणखी आहेत...