आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोळा फेक स्पर्धा, हॉकी, हॅन्डबॉल स्पर्धेत अकोल्याचे वर्चस्व

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अमरावती परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धा शुक्रवार, २७ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या. शहरातील वसंत देसाई क्रीडांगण, लाल बहादूर शास्त्री स्टेडियम, बहुउद्देशीय सभागृह येथे जवळपास २६ क्रीडा स्पर्धा झाल्या. महिला पुरुषांच्या गटात झालेल्या स्पर्धांमध्ये अकोलाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. हॉकी, ज्युडो, हॅन्डबॉल या सांघिक खेळांसह वैयक्तिक खेळातदेखील अकोल्याने वर्चस्व प्रस्थापित केले.
सकाळपासून झालेल्या विविध स्पर्धेत अकोला, अमरावती, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ येथील खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवले. पुरुषांच्या गटात अकोलाविरुद्ध अमरावती ग्रामीण यांच्यात रंगलेल्या हॉकीच्या सामन्यात अकोलाच्या संघाने ६-१ गोल ने विजय पटकावला. अकोला संघातील विक्रम याने ३, तौसिब यांनी तर नफीज यांनी एक गोल केला. यवतमाळविरुद्ध वाशीम यांच्यात झालेल्या दुसऱ्या सामन्यात यवतमाळ संघाने २-० ने विजय प्राप्त केला. यवतमाळविरुद्ध अकोला संघात झालेल्या खो- खोच्या सामन्यातदेखील अकोला संघाने बाजी मारली. हॅन्डबॉलच्या स्पर्धेत अकोला संघाने अमरावती ग्रामीण संघाचा १०-८ पराभव केला. तर यवतमाळविरुद्ध वाशीम संघात झालेल्या संघात यवतमाळ संघ विजयी झाला. ज्युडो स्पर्धेत महिलांच्या पुरुषांच्या दोन्ही गटात अकोला संघाला चॅम्पियनशिप प्राप्त झाली. महिलांच्या गटात द्वितीय स्थान बुलडाणा, तर तृतीय स्थान वाशीमने मिळवले. पुरुषांच्या गटात द्वितीय क्रमांक अमरावती, तर तृतीय क्रमांक अमरावती ग्रामीणने मिळवला.

१५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत पुरुषांमध्ये प्रथम स्थान अकोल्याचा राजू इटकर, द्वितीय अमरावती शहरचा सचिन मोरे तर तृतीय स्थान बुलडाणाच्या शुद्धोधन गवारगुरु यांनी पटकावले. गोळाफेक स्पर्धेत पुरुषांमध्ये प्रथम क्रमांक वाशीमच्या मिकीन खोपडे, द्वितीय अमरावती ग्रामीणच्या गोपी यादव तर तृतीय स्थान वामन मिसाळ यांनी मिळवले. महिलांच्या गटात अमरावती ग्रामीणची दीपाली प्रथम, अकोल्याची गिता द्वितीय तर बुलडाण्याची रुबिना शेख यांनी तृतीय क्रमांक मिळवला. बास्केटबॉलच्या स्पर्धेत महिलांमध्ये प्रथम झालेल्या अमरावती शहर विरुद्ध यवतमाळच्या सामन्यात अमरावती शहरला बाय मिळाला, तर अमरावती ग्रामीणविरुद्ध बुलडाणा संघात रंगलेल्या सामन्यात अरावती ग्रामीण संघाने ७-५ ने विजय पटकावला.

खो- खो स्पर्धेत पुरुषांच्या गटात प्रथम सामना यवतमाळविरुद्ध अकोला संघात रंगला. यात अकोला संघाने एक डाव, तीन गुणांनी विजय पटकावला. दुसरा समाना अमरावती ग्रामीणविरुद्ध बुलडाणा यांच्यात खेळला गेला. यात अमरावती ग्रामीण संघाने डाव तीन गुणांनी बाजी मारली. महिलांच्या गटात अमरावती ग्रामीणविरुद्ध वाशीम यांच्यात झालेल्या सामन्यात अमरावती ग्रामीणने बाजी मारली,. तर अमरावती शहरविरुद्ध अकोला संघात झालेल्या सामन्यात अकोला संघाला बाय मिळाल्याने पुढील स्पर्धेत संघाने आपले स्थान निश्चित केले. अमरावती ग्रामीणविरुद्ध यवतमाळ यांच्यात खेळल्या गेलेल्या फुटबॉलच्या सामन्यात अमरावती ग्रामीणने ३-० ने बाजी मारली, तर दुसऱ्या सामन्यात वाशीम संघाने बुलडाणा संघाने पराभूत केले. महिलांच्या गटात बुलडाणाविरुद्ध अमरावती ग्रामीण संघात झालेल्या व्हॉलीबॉलच्या सामन्यात अमरावती ग्रामीणने विजय पटकावला. महिलांच्या कबड्डीच्या पहिल्या सामन्यात अमरावती शहर संघाला बाय मिळाला, तर बुलडाणा विरुद्ध यवतमाळ यांच्यात झालेल्या सामन्यात बुलडाणा संघाने बाजी मारली.