आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाणा: मानधनवाढीबाबत झेडपीसमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे, 2 तास प्रवेशद्वार केले बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन देऊन त्यांना भविष्य निर्वाह निधी लागू करा, सेवा समाप्ती लाभ वाढवा, तसेच उन्हाळी सुटी पगारी लागू करा, यासह अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेने ११ सप्टेंबरपासून संपाचे हत्यार उपसले आहे. या संपाला पाठिंबा शासनाने दिलेले आश्वासन पाळल्याच्या निषेधार्थ सोमवार, १८ सप्टेंबरला आयटक सीटूच्या नेतृत्वात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडी कर्मचारी मदतनीस सहभागी झाल्या होत्या. 
 
जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडी सेविका मदतनीस दुपारी १२ वाजता जि. प.समोर जमा झाल्या. मानधन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन मिळालेच पाहिजे आदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. यानंतर कर्मचाऱ्यांनी जि. प. मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या दिला. त्यामुळे दोन तासांपर्यंत प्रवेशद्वार बंद राहिले. त्यानंतर जि.प. सीईओंना निवेदन दिले. काही महिन्यांपूर्वी सरकारने अन्य राज्यांप्रमाणे अंगणवाडी सेविका मदतनिसांचे मानधन वाढवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन पाळले नाही. त्याविरोधात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला. या संपामुळे राज्यभरातील अंगणवाड्या आज बंद होत्या. त्यामुळे सरकारने दिलेल्या आश्वासन पाळले नाही तर महामोर्चा काढण्याचा इशाराही निवेदनातून दिला. या आंदोलनात अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड, सचिव सरला मिश्रा, कोषाध्यक्ष जयश्री क्षीरसागर, मंदा डोंगरदिवे, माया तायडे, बेबी दाते, पार्वती पाटील, गोदावरी जाधव, वैशाली चहाकर, सुवर्णा लाटे, प्रतिभा वक्ते, प्रतिभा पाटील, उषा जैवळ, वर्षा शिंगणे, पुष्पलता खरात, पुंजाबाई चोपडे, अश्विनी सपकाळ, छाया पाटील, सुलोचना पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका मदतनीस सहभागी झाल्या होत्या. 
 
बातम्या आणखी आहेत...