आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज, धर्मासह अर्थसत्तेचा मुकाबला करा; प्रा. अंजलीताई अांबेडकर यांचे प्रतिपादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला- अाज देशात लोकशाहीवर घाला घालण्यात येत असून, रा.स्व.संघ-भाजप सरकार शिक्षण पद्धतीत हस्तक्षेप करीत अाहे,असा अाराेप प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी केला. गर्भ संस्कारातून गोळवलकर गुरुजींचे विचार पेरले जात अाहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपवण्याचा घाट घालण्यात येत असून, साेशल मीडियातून पंतप्रधान मोदींबाबत लिखाण करणाऱ्यांना नाेटीस बजावण्यात येत अाहेत. अजूनही मनुवाद जीवंत असून, मनुवादाला राजसत्तेचा अाश्रय अाहे, अशा शब्दात प्रा. आंबेडकर यांनी सरकारचा समाचार घेतला. 
 
मेळाव्यात विचारपीठावर बाैद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र दाराेकार गुरुजी, बी. संघपाल, अामदार बळीराम शिरसकार, कार्याध्यक्ष काशीराम साबळे, वसंतराव साळवे, डि.एन. खंडारे, माजी अामदार हरिभाऊ भदे, बालमुकुंद भिरड, जि.प.अध्यक्षा संध्या हरिभाऊ वाघाेडे, उपाध्यक्ष जमीर उल्लाखान पठाण, सभापती रेखा देवानंद अंभाेरे, देवकाबाई पाताेंड, जि.प.सदस्य विजय लव्हाळे, दामाेदर जगताप, गाेपाल काेल्हे, प्रतिभा अवचार, प्रा. सुरेश पाटकर, प्रदीप वानखडे, गजानन गवई, नगरसेविका धनश्री देव -अभ्यंकर, डाॅ. प्रसन्नजित गवई, शरद गवई, बुद्धरत्न इंगाेले, प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, डाॅ. रहेमान खान, डाॅ. हर्षवर्धन मालाेकार, रामदास मालवे, अाशा एेखे, विकास सदांशिव, बबलू शिरसाट उपस्थित हाेते. प्रास्तविक भीमराव खंडारे यांनी केले. मेळाव्याचे सूत्रसंचालन राजाभाऊ लबडे यांनी केले. 
 
कर्जमाफी,अारक्षण, नाेटीबंदीवरुन सरकारवर टीका : धम्ममेळाव्यात भारिप-बमंसच्या नेत्यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र साेडले. केंद्र राज्य सरकार फसवे असून, कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला, असे कार्याध्यक्ष काशीराम साबळे म्हणाले. सरकार अाता प्रशासकीय अारक्षणाला धक्का लावण्याचे काम करीत अाहे,असा अाराेप माजी अामदार हरिभाऊ भदे यांनी केला. नंतरच्या काळात राजकीय अारक्षणावरही गदा येणार अाहे. पदाेन्नतीमध्ये अारक्षण रद्द करण्याचा घाट घालण्यात येत अाहे. मनुवादाला उत्तर देण्यासाठी धम्ममेळाव्यांचे अायाेजन महत्त्वाचे असल्याचे मत माजी अामदार बळीराम शिरसकार म्हणाले. 
 
पंचशीलचे अाचारण करा : बी. संघपाल प्रत्येकानेपंचशीलचे अाचरण करावे, असे अावाहन बी. संघपाल यांनी केले. अाज केवळ गर्दी नकाे तर महापुरुषांच्या विचारांचे दर्दी हाेणे अावश्यक अाहे. डाॅ बाबासाहेबांचे विचार अाचारण्याचे अावाहनही त्यांनी केले. जगाला धम्माशिवाय पर्याय नाही,असे मदत रवींद्र दाराेकार गुरुजी यांनी व्यक्त केले. डाॅ. आंबेडकर यांचे कार्य पुढे नेण्याचे काम अॅड. बाळासाहेब आंबेडकर करीत अाहेत. त्यांना सर्वांनी साथ देण्याचे अावाहन जि. प. अध्यक्षा संध्या वाघाेडे यांनी केले. अच्छे दिनाचे अाश्वासन देत सत्तारुढ झालेले भाजप सरकार अार्थिक पिळवणूक करीत अाहे, असा अाराेप नगरसेविका धनश्री देव यांनी केला. 
 
चौथी पिढी विचार पीठावर 
महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची चौथी पिढी धम्म मेळाव्याच्या विचारपीठावर विराजमान हाेती. यात अॅड. बाळासाहेब आंबेडकर, प्रा,अंजलीताई आंबेडकर, मनीषाताई आनंदराज आंबेडकर, सुजात आंबेडकर, ऋतिका भीमराव आंबेडकर, साहिल आनंदराज आंबेडकर अमन आनंदराज आंबेडकर यांचा समावेश हाेता. आंबेडकर कुटुंब एकाच मंचावर पाहण्याचे भाग्य तमाम बहुजनांना लाभले.  
 
बातम्या आणखी आहेत...