आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुचाकीला अॅपेची धडक, एक ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- रमजानईदनिमित्त खरेदी करण्यासाठी जाताना दुचाकीला अॅपेने धडक दिली. त्यात चांदूर येथील माजी उपसरपंचाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी वाजताच्या सुमारास कौलखेडमधील एस.टी वर्कशॉपजवळील माहेर हॉस्पिटलसमोर घडली.

सै. तायरअली सै. अब्दुलअली इनामदार, वय ६३ असे मृतकाचे नाव आहे. सै. तायरअली हे माजी सरपंच आहेत. रमजान ईदनिमित्त घरात आनंदाचे वातावरण असताना आबालवृद्धांच्या आवडीनिवडीनुसार त्यांच्यासाठी खरेदी करण्याकरिता ते दुपारी दोन वाजताच्या सुमारास घरून अकोल्यात येण्यासाठी त्यांच्या एम.एच.३० एडी ५०१५ क्रमांकाच्या दुचाकीने निघाले होते. कौलखेडमधील माहेर हॉस्पिटल समोरून जात असताना विरुद्ध दिशेने भरधाव असलेल्या गॅस सिलिंडर भरलेल्या अॅपेने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात ते फेकल्या गेले. या वेळी त्यांच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खदान पोलिस वाहतूक शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या वेळी अॅपेचालक पळून गेला होता. खदान पोलिस ठाण्यात याप्रकरणी शौकतअली सै. अब्दुल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
बातम्या आणखी आहेत...