आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांच्या नियमित हजेरीसाठी अाता अॅप, बनावाबनवीच्या खिचडीला बसणार चाप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला : शाळांमधील विद्यार्थ्यांच्या नियमित हजेरीसाठी अॅप तयार करण्यात अाला असून, यासाठीची कार्यशाळा शाळा साेमवारी तोष्णीवाल ले-अाऊटमधील प्रभात किड्समध्ये अायाेजित करण्यात अाली. यातून शाळाबाह्य विद्यार्थी शाेधाता येतील, असे सांगण्यात येत असले तरी या अॅपमुळे पाेषण अाहाराचे (खिचडी) जादा देयक काढण्यासाठी विद्यार्थी संख्या जास्त दाखवण्याच्या प्रकाराला चाप बसेल, असाही दावा करण्यात येत अाहे. 
 
बहुता:श पालकांचा अाेढा दिवसेंदिवस काॅन्व्हेंटकडे वाढतच अाहे. जिल्हा परिषद, मनपा, नगर पालिका शाळांना सध्या गळती लागली अाहे. अनेक शाळांमध्ये तर १० शिक्षकांसाठी शिक्षक असतात. विद्यार्थ्यांंची संख्या कमी असली तरी कागदाेपत्री मात्र असे असले तरी पाेषण अाहारासाठी विद्यार्थ्यांंची संख्या वाढवण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी झाल्या. अनेकदा प्रशासनाकडून पाेषण अाहार वितरण (खिचडी) प्रक्रियेची पाहणी करण्यात अाली. मात्र अाहार पाेषणामधील बनवाबनवी कायमस्वरुपी बंद हाेतच नव्हती. 
 
दरम्यान, शासनाने विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी अाता मोबाईल अॅप तयार करण्यात अाले अाहे. या अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची हजेरी अपलाेड हाेणार अाहे. ही माहीती जिल्ह्यापासून ते मंत्रालयापर्यंत सर्वच यंत्रणा पाहू शकतील. 
 
असा बसेल चाप 
मुख्याध्यापक शालेय पाेषण अाहारासाठी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची माहीती शिक्षण विभागाला सादर करतात. अनेकदा जादा देयक काढण्यासाठी विद्यार्थी कागदाेपत्री दाखवण्यात येतात. मात्र अाता अॅपच्या माध्यमातून नियमित विद्यार्थ्यांची हजेरी हाेणार असल्याने पाेषण अाहारासाठी जादा विद्यार्थी दाखवणे महागात पडणार अाहे. 
 
अशी हाेईल हजेरी 
नियमित हजेरी पद्धतीसाठी तयार करण्यात अालेले अॅप हे माेबाईल फाेन अथवा संगणकामध्ये इन्साॅटल करावे लागणार अाहे. प्रत्येक वर्ग शिक्षकाला अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची नियमित हजेरी घ्यावी लागणार अाहे. विद्यार्थ्यांचा अाॅन लाईन डाटा बेस तयार करण्यात अाला अाहे. युएसडी काेड टाकून संबंधित शिक्षकांचा माेबाईल क्रमाकाची नाेंद करावी लागणार अाहे. राेज हजर असलेल्या विद्यार्थ्यांची नाेंद त्यामध्ये हाेणार अाहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...