आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलयुक्त शिवारमुळे हजारो लीटर पाण्याचा झाला संचय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गतआठवड्यात झालेल्या पावसाने जलयुक्त शिवार अभियानाचे यश समोर आणले आहे. जलयुक्त शिवार अभियानात केलेल्या शेततळे, सिमेंट नाला बांध दुरुस्ती, खोलीकरण रुंदीकरण कामांमुळे जलसाठा निर्माण झाला असून, यामुळे शेतकऱ्यांसह अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
गतवर्षी जिल्ह्यात २०० गावांची जलयुक्त शिवार अभियानात निवड केली. जिल्ह्यात हजार ८५७ विविध प्रकारची एकूण कामे असून, त्यापैकी हजार ९७० कामे पूर्ण झाली आहेत उर्वरित ८८७ कामे प्रगतिपथावर आहेत. या कामात २५ शेततळे, ३७ मोठे शेततळे, वनतळे, ३९ सिमेंट बंधारा दुरुस्ती, १२१ साखळी सिमेंट बंधारा दुरुस्ती, १८ नाला खोलीकरण सरळीकरण, सिमेंट नाला बांध खोलीकरण २७८, गावतलाव दुरुस्ती ३६, केटीवेअर दुरुस्ती ५८, विहीर पुनर्भरण ८२०, २८९ नाल्यांतून लोकसहभागातून गाळ काढणे, इतर कामांचा समावेश आहे. या पूर्ण झालेल्या सर्व जलस्रोतात पावसाचे पाणी साचून आहे. यामुळे सर्व भाग जलमय झाल्याचे दिसून येत आहेत. जिल्ह्यात १३० गावांत लोकसहभागातून शासकीय कामातून गाळ काढणे, खोलीकरण रुंदीकरणाची ४७३ कामे घेण्यात आली होती. लोकसहभागातून २० लाख ३८ हजार २३२ घनमीटर गाळ काढला असून, गाळ काढलेल्या रुंदीकरण खोलीकरण केलेल्या कामाची लांबी ६० कि.मी. असून, त्यापैकी ४३ कि.मी. कामे लोकसहभागातून केली आहे. या कामाची अंदाजित किंमत २७ कोटी ९४ लाख असून, त्यापैकी २५ कोटी ६१ लाखांची कामे लोकसहभागातून घेण्यात आली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी १०४.५ मि.मी. पाऊस पडला असून, वार्षिक सरासरीच्या १५ टक्के पाऊस आजपर्यंत झाला आहे. अजून जुलै, ऑगस्ट सप्टेंबर ही पावसाची महिने असल्यामुळे या वर्षी जिल्ह्यात सरासरी टक्केवारी गाठली जाईल, असे वाटते. दोन पावसाच्या मधात काही दिवसांचा खंड पडला, तर जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामातून संरक्षित सिंचन करून पिकांना जीवदान देणे शक्य होईल.

अभियानात विविध विभागांचा समावेश
शासनाने सर्वांसाठी पाणीटंचाईग्रस्त महाराष्ट्र अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान राबवले आहे. जलयुक्त शिवार अभियानात कृषी विभाग, लघुसिंचन जलसंधारण, जिल्हा परिषदेचे लघुसिंचन, वन विभाग, सामाजिक वनीकरण, पंचायत समितीचा कृषी विभाग, पाटबंधारे विभाग, भूजल सर्वेक्षण, पाणीपुरवठा विभाग यांसारख्या शासनाच्या विविध विभागांचा समावेश आहे.

या केल्या उपाययोजना
शेततळे,दगडी बांध, खोदतळे, गॅब्रियन बंधारा, सिमेंट नाला बांध, कोल्हापुरी बंधारा, साखळी सिमेंट बांध, नाला बांध खोलीकरण रुंदीकरण, जुन्या जलसंरचनाचे पुनर्जीवन, केटीवेअर बंधारे दुरुस्ती, पाझर तलाव दुरुस्ती, शिवकालीन गावतलाव, ब्रिटीशकालीन गाव तलाव, माती नाला बांध, सिमेंट नाला बांधमधील गाळ काढणे, विहीर बोअरवेल पुनर्भरण आदी कामाचा समावेश आहे.

पावसामुळे मिळाला शेतकऱ्यांना दिलासा
^जलयुक्त शिवार अंतर्गतसर्वच ठिकाणी चांगली कामगिरी झाली आहे. आतापर्यंत झालेल्या पावसाने या ठिकाणी चांगला जलसाठा जमा झाला आहे. सर्वांच्या प्रयत्नांना यश आल्याचा आनंद आहे. उर्वरित कामेसुद्धा पावसाळ्यानंतर सुरू हाेतील.'' जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी.
जलयुक्तच्या कामामुळे पावसाचे पाणी साचले अाहे.
शेतकरी, अधिकाऱ्यांनी व्यक्त केले समाधान
गावांत लोकसहभागातून गाळ काढणे, खोलीकरण रुंदीकरणाची ४७३ कामे घेण्यात आली होती.
लाख ३८ हजार २३२ घनमीटर गाळ काढला असून, केलेल्या कामाची लांबी ६० कि.मी. असून, त्यापैकी ४३ कि.मी. कामे लोकसहभागातून केली आहे.
बातम्या आणखी आहेत...