आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लघुसिंचन विभागाकडून जलयुक्तची ६३ कामे पूर्ण, पावसाळ्यात ३६० हेक्टर जमीन अाेलिताखाली येणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शेतीला पाणी मिळावे तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत चांगली कामगिरी जिल्ह्यात केलेली दिसून येते. सन २०१४-१५ मध्ये प्रस्तावित केलेल्या ७८ कामांपैकी ६३ कामे पूर्ण झाली असून, याचा फायदा निश्चित पावसाळ्यात होऊन ३६० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषी विभाग, महसूल विभागासोबतच जिल्हा परिषदेचा लघुसिंचन विभागसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शासनाकडून मिळालेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यात लघुसिंचन विभागाला यश मिळाले आहे. सन २०१४-१५ मध्ये जिल्ह्यात लघुसिंचन विभागाकडे २०० गावांची जबाबदारी सोपवण्यात आली. यात ५९ प्रकारची विविध कामे प्रस्तावित करण्यात आली होती. यांपैकी ६३ कामे वर्षाअखेर पूर्ण झाली असून यांपैकी कामे सध्या सुरू आहेत, तर १० कामे प्रगतिपथावर आहेत. गावतलाव दुरुस्ती, पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे दुरुस्ती, सिंचन तलाव दुरुस्ती, खोदतळे नवीन, डोह खोदणे, सिमेंट नाला बांध दुरुस्ती आदी कामांचा समावेश आहे.

^जलयुक्त शिवारअभियानांतर्गतजलसंधारणाच्या कामामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न सुटू शकेल. शिवाय अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याची टंचाईसुद्धा दूर होईल.'' धनराज मडावी, शाखाअभियंता लघुसिंचन.

शेती पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल
दृष्टिक्षेपात झालेली कामे
स्वरूपएकुण झालेली बाकी
गावतलाव दुरुस्ती ३८ २९
पाझरतलाव दुरुस्ती १०
कोल्हापुरी बंधारे नवीन
कोल्हापुरी बंधारे दुरुस्ती
सिंचन तलाव दुरुस्ती
खोदतळे दुरुस्ती
सिमेंट नाला बांध दुरुस्ती
एकूण ७८ ६३ १०
सन २०१६-१७ मध्ये प्रस्तावित कामे
तालुका एकुण झालेली बाकी
अकोला २६ १६ २८
मूर्तिजापूर २६ ११ १४
बार्शिटाकळी २८ २३ १६४
अकोट २३ १४ ३३
तेल्हारा १७
बाळापूर १२ १५
पातूर २९
एकूण १२५ ७८ ३००
प्रत्यक्षात सुरू झालेली कामे १६
बातम्या आणखी आहेत...