आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आर्णी नगरपरिषद कार्यालयाला ठोकले टाळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर्णी- यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी नगरपरिषदला आज (मंगळवारी) सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी टाळे ठोकले. नगरपरिषदेतील विविध समस्या प्रलंबित आहेत. त्या सोडवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी वज्रमुठ आवळली आहे.

आर्णी नगरपरिषदेत शिवसेना- काँग्रेस आघाडी आहे. राष्ट्रवादीचे आठ नगरसेवक असून ते विरोधी बाकावर  आहे. माञ नगर परिषदेत पाणी टंचाई, घण कचरा, नालेसफाई, शौचालयाची चौकशी, आठवडे बाजारचा ठेका आदी मागण्या करत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी परिषदेला टाळे ठोकले. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...