आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहन भागवत यांच्यावर कारवाई करा, बुलडाणा महिला काँग्रेसची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - राष्ट्रीयस्वयं सेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात महिलांबाबत वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी बुलडाणा शहर तालुका महिला काँग्रेसच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे. 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात लग्न या पवित्र बंधनाला सौदा करार संबोधले आहे. पत्नी ही घरातील काम करून नवऱ्याला सुख देते, म्हणून नवरा तिला खायला देतो. जर पत्नी कराराप्रमाणे वागत नसेल तर तीला सोडून द्या. तसेच जर पती करार पुर्ण करीत नसेल तर त्याला सोडून दुसरा ठेकेदार शोधा, असे वक्तव्य करून भारतातील महिलांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच राष्ट्रीय स्वयं सेवक संघटनेवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी संध्या इंगळे, इंदुताई घट्टे, ज्योत्सना जाधव, बानोबी चौधरी, सुनिला सुरोशे, नंदिनी टारपे, सुनिल तायडे, जाकीर कुरेशी, एम.वाय. शेख, अमोल तायडे, पंचायत समिती सदस्या उषा चाटे, सुरेश सरकटे, सुभाष वराडे, बाळु माेरे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. 
बातम्या आणखी आहेत...