आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेस गंडवणाऱ्या भामट्यास तासाभरातच अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवरखेड- तुम्हाला आशीर्वाद मिळेल असे सांगून एका भामट्याने येथील बालाजी मंदिराजवळ राहणाऱ्या महिलेस सोन्याच्या अंगठीसह १० हजार रुपयाने गंडवल्याची घटना बुधवारी घडली. शारदा नंदकिशारे वर्मा वय ५० ही महिला घरात एकटी असल्याचे पाहून महिलेच्या वेशात घरामध्ये प्रवेश करून या महिलेस हळदी कुंकू लावून तुम्हाला आशीर्वाद लाभेल, तुमच्या सुनेला मुलबाळ होईल असे सांगून घरातील वस्तू पैसे घेऊन येण्यास सांगितले.
त्यानंतर या महिलेने रोख २३०० रुपये सोन्याची अंगठी साहित्य ताटात ठेवून पूजाअर्चा केली. त्यानंतर हा भामटा सर्व मुद्देमाल घेऊन फरार झाला. या महिलेने आरडाओरडा करून तिच्या पतीला बोलावून घेतले.
त्यानंतर पोलिसांत तक्रार दिली. ठाणेदार भास्कर तंवर यांनी तपासचक्रे फिरवत एका तासाच्या आत आठवडी बाजारातील एका खोलीत वेशांतर करत असलेल्या त्या भामट्याला पकडले. त्याच्याजवळून सोन्याची अंगठी रोख रक्कम जप्त केली. धर्मा सुखलाल सोळंके रा. सोनाळा ता. संग्रामपूर जिल्हा बुलडाणा असे या भामट्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक करून विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास ठाणेदार तंवर, ज्ञानदेव बोरकर, गणेश सोळंके, दांदळे करत आहेत.