आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Artificial Insemination Process Boon For Farmers

कृत्रिम रेतन प्रक्रिया ठरतेय शेतकऱ्यांसाठी वरदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी प्रजननक्षम आणि तेही जास्त प्रमाणात दूध देणारी जनावरे शेतकऱ्यांकडे असणे आवश्यक आहेेत. यासाठी शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. तरीही जास्त दूध देणारी जनावरे उपलब्ध होत नसल्याने पशुसंवर्धन विभागामार्फत कृत्रिम रेतनाची प्रक्रिया जिल्ह्यात १२९ केंद्रांवर यशस्वीरीत्या पार पडत आहे. या प्रक्रियेचा शेतकऱ्यांना लाभ होत असून, डिसेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यातील २२ हजार ९३५ जनावरांवर ही प्रक्रिया करण्यात आली आहे. या माध्यमातून ७,४८८ जनावरे जन्मास आली आहेत.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विदेशी जातीचे किंवा जास्त दूध देणाऱ्या वळूच्या जातीचे अानुवंशिकता असलेल्या वळूपासून वीर्य संकलन करून त्या विर्याची साठवण दहा-दहा वर्षे टिकेल, असे तंत्रज्ञान सध्या विकसित करण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान विकसित झाल्याने अशा प्रकारच्या वीर्य मात्रा कृत्रिम केंद्रावर विशेष यंत्रणेमार्फत पुरवठा करून त्या कार्यक्षेत्रातील गाई, म्हशींना कृत्रिम रेतनाचे कार्य केले जाते. ही सेवा पशुधन विभागामार्फत २१ रुपये घेऊन लोकहितार्थ राबवण्यात येत आहे. या मागील विभागाचा उद्देश म्हणजे स्थानिक जाती, पण चांगल्या प्रतीचे अानुवंशिक सुधारणा करून त्याची उत्पादकता येणाऱ्या पिढीची पैदास होणाऱ्या संकरित कालवडी आणि पारड्या यांचे दूध उत्पादन वाढणे हा आहे. केवळ २१ रुपयांमध्ये पशुधन विभागामार्फत कृत्रिम रेतन केले जात असून, याचा शेतकऱ्यांनी लाभ घेणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
^पशुधन विभागाची कृत्रिम रेतन ही प्रक्रिया लोकोपयोगी असून, या प्रक्रियेचा शेतकऱ्यांनी लाभ घेऊन प्रजननक्षम जनावरांची संख्या कशी वाढवता येईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रेतनाची प्रक्रिया अविरत सुरू असून, गावानजीकच्या दवाखान्यात ती उपलब्ध आहे. व्ही. बी. जायभाये, प्रभारीजिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, बुलडाणा.

या ठिकाणी केले जाते कृत्रिम रेतन
पशुवैद्यकीयसर्व चिकित्सालय- ०१
तालुका लघू पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय-०६
फिरते पशुवैद्यकीय दवाखाने-०२
श्रेणी आणि पशुवैद्यकीय दवाखाने -१००
आधारभूत ग्रामीण उपकेंद्र- २०

प्रक्रियेनंतर डिसेंबर २०१५ पर्यंत जन्मास आलेली जनावरे
संकरित गायींवर कृत्रिम रेतनाच्या प्रक्रियेनंतर डिसेंबर २०१५ पर्यंत नर २,३०६ आणि मादी- २,०३७ जनावरे जन्मास आली, तर देशी गायींवरील प्रक्रियेनंतर नर १९२, मादी १५०, तर म्हैस वर्गात नर १,४९४, तर मादी १,३०९ .
२२,९३५ एकूण
७,४३० म्हैस वर्ग
२,०९० देशी गायी
७,१८७ संकरित गायी
६,२२८ विदेशी गायी