आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाळा येथील आश्रम शाळा प्रकरणी प्रकल्प अधिकाऱ्यास निलंबित करा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अप्पर जिल्हाधिकारी टाकसाळे यांना मागण्याचे निवेदन देतांना आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीचे पदाधिकारी. - Divya Marathi
अप्पर जिल्हाधिकारी टाकसाळे यांना मागण्याचे निवेदन देतांना आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीचे पदाधिकारी.
बुलडाणा - जिल्ह्यातील आदिवासी शाळा सैनिक शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या हजेरी पटाची तपासणी करून खामगाव तालुक्यातील पाळा येथील आश्रम शाळेतील बनावट विद्यार्थी प्रकरणी प्रकल्प अधिकाऱ्यास निलंबित करण्यात यावे. तसेच अनुदानाची रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीने आज डिसेंबर रोजी निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यातील अनुदानित आश्रम शाळा सैनिकी शाळांमधील विद्यार्थ्यांची गाव पातळीवर समिती स्थापन करून त्यामध्ये आदिवासी संघटनेचा प्रतिनिधी नियुक्त करण्यात यावा. तसेच पाळा येथील आश्रम शाळेत बनावट विद्यार्थी दाखवून शासनाचे लाखो रुपयाचे अनुदान लाटण्यात आले आहे. अनुदान हे प्रकल्प अधिकाऱ्यांच्या खोट्या अहवालामुळे संस्थाना देण्यात आले आहे. त्यामुळे सदर प्रकल्प अधिकाऱ्यास निलंबित करून त्यांच्या वेतनातून अनुदान वसूल करण्यात यावे. आदिवासी आश्रम शाळा सैनिकी शाळेतील विद्यार्थ्याच्या हजेरी पटाची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी पारधी महासंघाचे विदर्भ अध्यक्ष सुखदेव डाबेराव, आदिवासी पारधी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद डाबेराव, गजानन सोळंके, मानसिंग चव्हाण, बलसिंग चव्हाण, नितिन खोनगरे, प्रविण चव्हाण, संतोष चव्हाण, हरसिंग राणे अंबादास डाबेराव यांनी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...