आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काकाला मारणारा पुतण्या कारागृहात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - बोरगावमंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जत्रीपाळा पळसो बढे येथे काका-पुतण्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यात पुतण्याने काकाला काठीने मारहाण केली. मारेकरी पुतण्याविरुद्ध बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली.
२६ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता अरूण सुखदेव इंगळे वय ५४ हे त्यांच्या घरी असताना त्यांचा पुतण्या विनोद शशिकांत इंगळे त्याची पत्नी हे दोघे त्यांच्या घरी गेले आणि अंगणात कचरा का फेकला म्हणून भांडू लागले. त्यात अरूण इंगळे हे गंभीर जखमी झाले. भांडणाचा आवाज ऐकून अरुण इंगळे यांचे भाऊ अनिरुद्ध सुखदेव इंगळे हे पत्नी पुतण्या अमोल राजेंद्र इंगळे यांच्यासह त्यांच्या घरी गेले. तेव्हा त्यांच्या भावाला त्यांचा पुतण्या विनोद शशिकांत इंगळे हा मारहाण करीत होता. भाऊ पुतण्या वेळीच पोहचल्याने विनोद इंगळे त्याची पत्नी निघून गेले. त्यानंतर अनिरुद्ध इंगळे यांनी पोलिस ठाणे गाठून पोलिसात विनोद शशिकांत इंगळे याच्याविरूद्ध तक्रार दिली. पोलिसांनी विनोद इंगळे याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. २८ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले.
न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची रवानगी कारागृहात केली.
बातम्या आणखी आहेत...