आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एटीएम’ झाले कॅशलेस, शहरातील नागरिकांची खाेळंबली कामे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - हातातली कामे बाजूला ठेवून एटीएम मधून पैसे काढण्यासाठी जावे आणि तिथे ‘नो कॅश’ असा संदेश आला तर ग्राहकांची पार निराशा होते. सोमवारी रात्रीपासूनच अकोल्यातील ग्राहकांना हा जाच सहन करावा लागला. मंगळवारी सायंकाळपर्यंत ही स्थिती होती. रविवार, सोमवारी बँकांना सुटी असल्याने शहरातील बहुतांश एटीएममधून पैसे संपून गेले. लोकांची कामे खोळंबली. बँकांनी बाहेरच्या एटीएमची कामे एजन्सीला दिलेली असल्याने संबंधित यंत्रणा जेव्हा एटीएममध्ये पैसे भरेल तेव्हा ग्राहकांना पैसे मिळू शकतात. अन्यथा बँकांचे अधिकारीही हतबल होतात.
दोन दिवस बँका बंद राहिल्या म्हणून ग्राहकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे. एका एटीएममध्ये ते लाख रुपये अपलोड केले जातात. शहरामध्ये असलेल्या एटीएमची संख्या पाहता. काही ठिकाणी तरी पैसे मिळायला हवे होते परंतु दुर्दैवाने तसे झाले नाही. बँका उघडेपर्यंत तर लोकांची गैरसोय झालीच परंतु त्यानंतरही पैसे काढण्यासाठी ताटकळत बसावे लागले. काही बँक अधिकाऱ्यांनी ग्राहकांची होत असलेली अडचण लक्षात घेऊन बँकेच्या आतील एटीएम ग्राहकांना सुरू करुन दिले. काही एटीएमवर ग्राहकांना व्यवस्थित सेवा मिळत नाही. स्टेट बँकेचे रामदासपेठेतील एटीएम तीन दिवसांपासून बंद आहे. तर, रेल्वेस्टेशन रोडवरील आयडीबीआय बँकेचे एटीएम ही ग्राहकांसाठी डोकेदुखी होऊन बसली आहे. कधीही जा येथे लिंक नसते. कामे हातावेगळी करण्यासाठी ग्राहक सकाळी जातात परंतु निराश होऊन परतावे लागते. तेथील सुरक्षा रक्षकही व्यवस्थित उत्तरे देत नाहीत. ग्राहकांवर उपकार करण्याची त्यांची भाषा असते.
अनेक ग्राहकांना हा अनुभव येतो. बँकेचे अधिकारी हात झटकून मोकळे होतात. मुक्त आर्थिक धोरणामध्ये ग्राहकांशी बांधिलकी उरली की नाही हा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. ग्राहक पंचायतने हा विषय हाती घेण्याची वेळ आली आहे. सोमवारी रात्री रेल्वेस्टेशननजीक स्टेट बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी ग्राहक मोठ्या संख्येत जमले होते. परंतु मशीन खराब असल्याने त्यांना पैसे काढता आले नाही. संताप व्यक्त करुन त्यांना परत फिरावे लागले.
एजन्सीकडून ‘निल इंडेंट’
संबंधित बँकांच्या एटीएममध्ये एजन्सीकडून पैसे टाकण्याबाबत बँकेला इंडेंट पाठवला जातो. परंतु काही बँकांना एजन्सीने अगदी निल इंडेंट पाठवला. शाखा व्यवस्थापकांनी त्याची दखल घेऊन त्यात सुधारणा करण्याचे निर्देश एजन्सीला दिले. निल इंडेंट टाकला म्हणजे पैसे टाकण्याची गरज नाही असे होत नाही. एजन्सीने हात झटकण्याचाच हा प्रकार समोर आला.
सुटीमुळे उडाला गोंधळ
स्टेटबँकेच्या शहरातील ३५ एटीएममध्ये रोकड टाकली होती. परंतु दोन दिवस बँकेला सुटी आल्याने मंगळवारी मशीनमधील पैसे संपून गेले. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय झाली. आम्ही ग्राहकांच्या सेवेसाठी आहोत. मंगळवारी दुपारनंतर काही एटीएममध्ये पैसे टाकले अाहे. एस.टी. बोर्डे, मुख्य शाखा प्रबंधक, स्टेट बँक.
बँकेचे आतील एटीएम सुरू केले
शास्त्रीनगरातील बँकेचे बाहेरील एटीएम बंद असल्याने ग्राहकांची अडचण लक्षात घेऊन मंगळवारी बँकेचे आतील एटीएम सुरू करुन दिले. सोमवारी रात्रीही एटीएमची पाहणी करायला आलो होतो. लागोपाठ सुटीमुळे हा प्रकार घडला. डी.एस. सरदेशमुख, शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ बडोदा.
एजन्सीकडून ‘निल इंडेंट’
संबंधित बँकांच्या एटीएममध्ये एजन्सीकडून पैसे टाकण्याबाबत बँकेला इंडेंट पाठवला जातो. परंतु काही बँकांना एजन्सीने अगदी निल इंडेंट पाठवला. शाखा व्यवस्थापकांनी त्याची दखल घेऊन त्यात सुधारणा करण्याचे निर्देश एजन्सीला दिले. निल इंडेंट टाकला म्हणजे पैसे टाकण्याची गरज नाही असे होत नाही. एजन्सीने हात झटकण्याचाच हा प्रकार समोर आला.
बातम्या आणखी आहेत...