आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएसने घेतले एकाला ताब्यात, आरोपी प्रतिबंधित संघटनेचा सदस्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - एका प्रतिबंधित संघटनेच्या आरोपीला शुक्रवारी अकोला एटीएसने नागपूरहून ताब्यात घेतले आहे. या आरोपीविरुद्ध देशविघातक कारवायांबाबत गंभीर आरोप आहेत. २०१२ पासून त्याचा शोध अकोला एटीएस घेत होते. त्याच्याकडून काय खुलासे होतात हे समोर येणार आहे.
२०१२ मध्ये एटीएसने बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीमध्ये छापे टाकले होते. कारवाईत काही लोकांना ताब्यात घेतले होते. या आरोपींच्या चौकशीतून अम्मान उर्फ सराफत मुकीम खानसुद्धा गंभीर प्रकरणात सहभागी असल्याचे समोर आले होते. त्यावरून त्याच्याविरुद्ध प्रतिबंधित संघटनेचा सदस्य म्हणून देश विघातक कारवायांमध्ये सहभागी असणे घातक शस्त्रे ठेवण्याचे आरोप निश्चित केल्याने फरार असलेल्या अम्मानचा एटीएस शोध घेत होते. दरम्यान, इंदूर एटीएसने त्याला अटक केली होती. त्यानंतर नागपूर एटीएसनेसुद्धा त्यांच्याकडे असलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात ताब्यात घेतले होते. त्याला विशेष न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्याची पोलिस कोठडी संपल्यानंतर अकोला एटीएसने नागपूर एटीएसकडून हस्तांतरीत केले.