आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गतवर्षीची वृक्षलागवड; संगाेपनाचे हाेईल अाॅडिट; पंचायत समिती पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी घेतला अाढावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - तालुक्यातील शाळांमध्ये गतवर्षी लावण्यात अालेल्या वृक्षलागवड संगाेपनाचे अाॅिडट करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या मुख्याध्यापकांच्या अाढावा बैठकीत घेण्यात अाला. यंदाही तालुक्यातील सर्वच शाळांमध्ये ते जुलै या दरम्यान वृक्षलागवड माेहिम राबवण्याबाबत नियाेजन करण्यात अाले. बैठकीला प्रामुख्याने सभापती अरूण पराेडकर, उपसभापती गणेश अंधारे, गट शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार, विस्तार अधिकारी लेखणार उपस्थित हाेते.
 
वृक्षराेपण माेहिम जिल्ह्यात राबवण्यासाठी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व अधिकाऱ्यांनी बैठक झाली हाेती. दरम्यान, वृक्ष लागवड माेहिमेबाबत शुक्रवारी पार पडलेल्या मुख्याध्यापकांच्या अाढावा बैठकतही चर्चा करण्यात अाली. बैठक अागरकर विद्यालयात पार पडली. बैठकीला अकाेला तालुक्यातील मुख्याध्यापक उपस्थित हाेते. कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी बैठकीत दिला. मात्र चांगले कार्य करणाऱ्यांचा सत्कारी करण्यात येईल, असेही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक शाळेत लागणार १० वृक्ष
अकाेला पंचायत समितीअतंर्गत असलेल्या १८५ शाळांमध्ये वृक्ष लागवड माेहिम राबवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. प्रत्येक शाळेत १० वृक्षांची लागवड करण्यात येणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...