आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑटो चालकाने केला आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या जाचाला कंटाळून घेतले विष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट; वाहतूक पोलिसांच्या जाचाला कंटाळून एका ऑटोचालकाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी अकोट येथे घडली. याप्रकरणी पोलिसांत कोणत्याही प्रकारची नोंद झाली नसल्याची माहिती आहे.
अजय बापुराव दिवेकर (वय ३५, रा. अकोलखेड) असे ऑटोचालकाचे नाव आहे. अजय दिवेकर हा गुरुवारी अकोलखेड येथून ऑटोमध्ये बसवून लहान मुले भाविकांना गणेश दर्शनासाठी अकोट येथे घेऊन आला होता. येथे आल्यावर त्याने ऑटोरिक्षा क्रमांक एमएच ३० पी ९१३४ हा अकोला मार्गावर रस्त्याच्या बाजूला उभा केला होता. मात्र, त्या ठिकाणी हजर असलेल्या पोलिसांनी त्याला त्या ठिकाणाहून ऑटो बाजूला लावण्यास सांगितले. परंतु, अजय दिवेकरने ऑटोरिक्षा काढल्याने दोन वाहतूक पोलिसांनी हा ऑटो पोलिस ठाण्यात नेऊन लावला. त्यानंतर अजय दिवेकरने कुणालाही सांगता ऑटो ठाण्यातून नेला. यावरून पुन्हा वाहतूक पोलिस दिवेकरमध्ये बाचाबाची झाली.
आज सकाळी पोपटखेड मार्गावर वाहतूक पोलिस दिवेकरमध्ये वाद झाला. त्यानंतर दिवेकरने विषारी औषध प्राशन केले. दरम्यान, त्या ठिकाणी उपस्थित ऑटोचालकांनी दिवेकरला तत्काळ अकोटच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर प्रथमोपचार करून त्याला अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयात हलवले. दिवेकरची प्रकृती सुधारत असल्याची माहिती आहे.