आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी विधवा महिलांना मिळणार ऑटोरिक्षा परवाना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना चरितार्थाचे कायमस्वरूपी साधन उपलब्ध करण्याच्या दृष्टिने, विधवा महिलांना ऑटोरिक्षा परवाने वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. ही योजना २१ जानेवारीपासून शासनाने बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजनेच्या रुपात शासन निर्णय काढून सुरू केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ७८१ पात्र कुटुंबातील विधवांना याचा लाभ होणार आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाला एक लाख रुपये तातडीची मदत सानुग्रह अनुदान म्हणून शासनाकडून देण्यात येते. मात्र, या अनुदानातील ७० हजार रुपये हे पोस्ट अथवा बँकेत गुंतवण्यात येतात. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचा कायमस्वरुपी प्रश्न सुटत नाही. त्यामुळेच शासनाच्या गृह विभागाने हा निर्णय आज काढला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीसाठी नियमित उत्पन्नाचे साधन उपलब्ध होण्याच्या दृष्टिने एक विशेष बाब म्हणून विधवा महिलांच्या नावाने ऑटोरिक्षा परवाना वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील प्रादेशिक परिवहन प्राधिकरणांनी निर्णय घेऊन त्यांच्या क्षेत्रामध्ये नवीन ऑटाेरिक्षा परवाने जारी करण्याबाबत घातलेले निर्बंध आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींच्या बाबतीत शिथील करण्यात आले.
शंभरटक्के कर्ज पुरवठा होणार : ऑटोरिक्षाखरेदी करण्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीकडे आर्थिक तरतूद नसल्याची बाब विचारात घेऊन त्यांना शंभर टक्के कर्ज पुरवठा होणे आवश्यक आहे. हा कर्ज पुरवठा राज्यातील वित्त पुरवठा करणाऱ्या तत्सम बँका तत्सम वित्त संस्थांकडून करण्यात येणार असल्याचे निर्णयात नमूद आहे.

अनुदानासपात्र विधवा : १९डिसेंबर २००५ ते २२ जानेवारी २००६ च्या शासन निर्णयानुसार एक लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे. त्यासाठी पात्र ठरवले आहे. अशाच शेतकऱ्यांच्या विधवा ऑटोरिक्षा परवान्यासाठी पात्र ठरतील. लायसन्स, बॅच बिल्ला आदी अटींबाबत सूट देण्यात येत आहे.

बुलडाणा अर्बनने राबवला पॅटर्न : बुलडाणाअर्बन पतसंस्थेच्या शेतकरी विधवा महिलांना अाॅटोरिक्षा वाटप संदर्भाचा आधार घेत गृह विभागाने सदरचा शासन निर्णय घेतला आहे. त्यामुळे बुलडाण्याचे नाव पुन्हा एकदा शासनस्तरावर चमकले आहे.

पोस्टाच्या बँकेच्या खात्यातील ७० हजारांची ठेव हमीपात्र ठरणार
कर्जपुरवठा म्हणून हमी घेताना पोस्ट अथवा बँकेच्या खात्यात ठेवण्यात आलेली ७० हजार रुपयांची ठेव हमीपात्र म्हणून वापर करता येणार आहे. अशा विधवांचे पालकत्व परिवहन अधिकाऱ्यांकडे राहणार आहे. आॅटारिक्षा चालवण्यासाठी पात्र व्यक्तीची निवड करण्यासाठी विधवा महिला परवानाधारकांना परिवहन अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करावे लागणार आहे. परवानाधारकासोबत ठरवलेली रक्कम परवानाधारकाच्या बँक खात्यात जमा होत असल्याबाबत लक्ष ठेवावे लागणार आहे.

शंभर विधवांना देणार ऑटाेरिक्षा
^आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांना ऑटोरिक्षा देण्यासाठी प्रायोगिक तत्वावर बुलडाणा अर्बनने ठरवले आहे. सुरुवातीला शंभर विधवांना ऑटो देणार आहे. शेतकरी कुटुंबातील ऑटो चालवणाऱ्याकडून ऑटोची रक्कम काही प्रमाणात परवानाचालक विधवांना काही रक्कम बँकेत जमा करण्याचा अर्बनचा निर्णय आहे. २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी हा उपक्रम उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राबवण्यात येणार आहे. राधेश्याम चांडक, बुलडाणाअर्बन बँक,बुलडाणा.

पात्र कुटुंब
२००१-
२००२-
२००३- १२
२००४- ३८
२००५- ३९
२००६- ९९
२००७- ४२
२००८- ५२
२००९- ४९
२०१०- ६७
२०११- ५२
२०१२- ८०
२०१३- ५७
२०१४- ९१
२०१५- ९३