आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्तीची कागदपत्रे पडताळणीच्या माेहिमेला जिल्ह्यात सहा महाविद्यालयांनी दिला ‘खो’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शिष्यवृत्तीचे अर्ज पडताळणी करण्याच्या समाज कल्याण विभागाच्या मोहिमेला अकोट आणि तेल्हारा तालुक्यातील सहा महाविद्यालयांनी खो दिला आहे. या सर्व महाविद्यालयांना समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांनी शो कॉज नोटीस बजावल्या असून सुस्पष्ट स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. भारत सरकारची मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती मिळण्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांमार्फत ऑनलाईन अर्ज भरले जातात. या अर्जात अनावधानाने राहिलेल्या त्रुट्या तपासून त्या विशिष्ट वेळेच्या आत पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी त्या-त्या महाविद्यालयांची असते. ही जबाबदारी निभावणे सोपे व्हावे म्हणून समाज कल्याण विभागाने शुक्रवारपासून तालुकानिहाय शिबिरे आयोजित केली आहे. 

या शिबिरांची पूर्वकल्पना संबंधित महाविद्यालयांना देण्यात आली असून वेळापत्रकही आधीच कळविण्यात आले आहे. मात्र तरीही काही महाविद्यालयांनी त्यांच्याकडे प्रवेश घेतलेल्या शिष्यवृत्तीधारक वियद्यार्थ्यांची कागदपत्रे पडताळून घेतली नाहीत. 

यामध्ये अकोट तालुक्यातील दोन तेल्हारा तालुक्यातील चार महाविद्यालयांचा समावेश आहे. या सर्व महाविद्यालयांना ‘शो कॉज’ नोटीस बजावण्यात आल्या असून सविस्तर खुलासा मागविण्यात आला आहे. भविष्यात विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी त्या-त्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांची असेल, असेही या नोटीसमध्ये लिहण्यात आले आहे. 
या महाविद्यालयांसाठी त्या शहरांत शुक्रवार शनिवारी विशेष शिबीर घेण्यात आले. 

या महाविद्यालयांना बजावल्या नोटीस 
नोटीस बजावण्यात आलेल्या महाविद्यालयांमध्ये अकोट तालुक्यातील श्रीराम कनिष्ठ कला महाविद्यालय, रुईखेड आणि स्व. जगजीवन कनिष्ठ महाविद्यालय, अकोटसह तेल्हारा तालुक्यातील डॉ. जगन्नाथ ढोणे कला-विज्ञान महाविद्यालय अडगाव, सहदेवराव भोपाळे कनिष्ठ महाविद्यालय हिवरखेड, जि.प. कनिष्ठ महाविद्यालय अडगाव जि.प. महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय हिवरखेडचा समावेश आहे.