आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेन स्नॅचिंग रोखण्यासाठी जनजागृती , गुन्हेगारी रोखण्यासाठी जनप्रबोधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सोनसाखळी चोरी, दागिने चमकवून देण्याच्या नावाखाली फसवणूक, पोलिस असल्याची बतावणी करून लूट, चोरी, गुंडगिरी अशा गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. त्याची सुरुवात केली आहे. आेमनी कारमधून ऑडिओ क्लिप वाजवून हा उपक्रम राबवला जात आहे. नागरिकांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत केले.
बँकेतून बोलतो असे सांगून एटीएम नंबर विचारणे, त्यावरून ऑनलाइन खरेदी करणे, बक्षीस लागल्याचे सांगून ठकवणे, मोबाइलवर एसएमएसद्वारे बक्षीस लागल्याचे सांगून रक्कम उकडणे यांसारख्या घटनांमधून मोठ्या प्रमाणात नागरिकांची लूट होत आहे. ते थांबवण्यासाठी पोलिसांकडून ऑडिअो क्लिपच्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या सूचनेवरून खदान पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सी. टी. इंगळे यांनी या क्लिपचे संकलन केले आहे. शहरातील विविध भागांत आेमनी कार फिरून जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांची फसवणूक थांबावी, यासाठी पोलिस प्रशासनाने पाऊल उचलले आहे, त्याचे स्वागत होत आहे.

क्लिपच्या माध्यमातूनही प्रबोधन
पोलिसांनी ऑडिओ क्लिप बनवली असून, ती नागरिकांपर्यंत पोहाेचवली जात आहे. यात नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत माहिती दिली आहे.
{महिलांनी सोनसाखळी झाकून ठेवाव्यात किंवा घालू नये.
{ पोलिस असण्याची बतावणी करणाऱ्यावर विश्वास ठेवू नये.
{ दुचाकीवर पत्ता विचारायला येणाऱ्या अनोळखी इसमावर चटकन विश्वास ठेवू नये.
{ कोणत्याही प्रकारची तक्रार, सूचना किंवा माहिती असल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधावा.
{ आपली वाहने रात्री सुरक्षित ठिकाणीच पार्क करावीत.
{ वाहनांना सुरक्षा यंत्रणा बसवावी.
{ वाहनात मौल्यवान वस्तू ठेवू नका.
{ फोनवरून एटीएम नंबर सांगू नका.

शहानिशा करून व्यवहार
^फोनवर कोणतीही बँक पासवर्ड विचारत नाही, ते सांगू नका, प्रत्यक्ष खात्री करूनच काेणताही व्यवहार करावा. शंका आल्यास पोलिसांशी संपर्क करावा.'' सी. टी. इंगळे, ठाणेदार,खदान पोलिस ठाणे.