आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गत पाच महिन्यांपासून आयुर्वेद दवाखाना बंद, रुग्णांना धरावी लागते खासगी दवाखान्याची वाट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बावनबीर येथील आयुर्वेद दवाखान्याला लावण्यात आलेले कुलूप. - Divya Marathi
बावनबीर येथील आयुर्वेद दवाखान्याला लावण्यात आलेले कुलूप.
बावनबीर - गावांसह परिसरातील चार ते पाच गावातील हजारो नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असलेला येथील जिल्हा परिषदेचा आयुर्वेद दवाखाना मागील पाच महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे नाईलाजास्तव गोरगरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करून खासगी दवाखान्यात उपचार करून घ्यावे लागत आहे. पाच महिन्यापासून दवाखाना बंद असतानादेखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठलीच दखल घेतली नाही. त्यामुळे परिसरातील रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. रुग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी हा दवाखाना पुर्ववत सुरू करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळावा, यासाठी मागील काही वर्षापूर्वी बावनबीर येथे जिल्हा परिषद प्रशासनाने आयुर्वेद दवाखान्याची निर्मिती केली आहे. या दवाखान्याला बावनबीर, पंचाळा, पडसोड, उमरा यासह इतर गावे जोडण्यात आली आहे. परिसरात बहुसंख्य आदिवासींचे वास्तव्य असल्याने त्यांचा भरवसा आयुर्वेद दवाखान्यावर आहे. असंख्य आदिवासी रुग्ण अॅलोपॅथीच्या दवाखान्यात जाता आयुर्वेद औषधी घेतात. यापूर्वी या दवाखान्यात उपचार करून असंख्य रुग्ण बरे झाले आहेत. परंतु गेल्या पाच महिन्यापासून या दवाखान्याला कुलूप लावण्यात आले आहे. गावांसह परिसरातील असंख्य रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयात येतात. परंतु दवाखान्याला कुलूप पाहून ते परत जातात. परिणामी त्यांना नाईलाजास्तव आर्थिक भुर्दंड सहन करून खासगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागत आहेत. त्यामुळे खासगी दवाखाने रुग्णांनी हाऊसफुल्ल झालेले दिसून येत आहेत. मागील काही दिवसापासून वातावरणात बदल झाल्यामुळे परिसरात ताप, खोकला, सर्दी, डोकेदुखी, हिवताप, विषमज्वर आदी आजाराने थैमान घातले आहे. परंतु हा दवाखाना बंद असल्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. शिवाय दवाखाना बंद असल्यामुळे एकही वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी हजर नाहीत. त्यामुळे रुग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी हा आयुर्वेद दवाखाना तत्काळ सुरू करून वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

आयुर्वेद दवाखाना तत्काळ सुरू करावा
^बावनबीर परिसरामध्येविविध आजारांनी थैमान घातले आहे. येथील दवाखाना बंद असल्यामुळे रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. रुग्णांची हेळसांड होवू नये, यासाठी तातडीने बंद असलेला दवाखाना सुरू करण्यात यावा.’’
सरलाभगत, सरपंच बावनबीर

डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे बंद
-तालुक्यात डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे कोणाकडे पदभार दिला नाही. या बाबत अकोला उपसंचालक यांच्याकडे पत्र व्यवहार करण्यात आला आहे. डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे हा दवाखाना बंद आहे. डॉक्टराची नियुक्ती झाल्यानंतर दवाखाना उघडण्यात येणार आहे.’’ बी.व्ही.सोमवंशी, तालुका आरोग्य अधिकारी
बातम्या आणखी आहेत...