आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळाला दीड वर्षांपर्यंत स्तनपान करावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - स्त्रीचे आरोग्य आणि आहार या परस्परसंबंधी घटकाकडे आजची स्त्री दुर्लक्ष करते. त्याचा परिणाम माता आणि नवजात बाळाच्या आरोग्यावर झाल्याने सामाजिक स्वास्थ्यालाही धोका पा पोहोचतो. त्यामुळे प्रत्येक आईने बाळाला किमान दीड वर्षांपर्यंत स्तनपान करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ नीलिमा टिंगरे भोयर यांनी दिला.
1 ते 7 ते ऑगस्टदरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह पाळला जातो. त्यानिमित्ताने आहारतज्ज्ञ नीलिमा टिंगरे यांनी स्तनपानावर प्रकाश टाकला. जवळपास ४० टक्के बालके कमी वजनाची १५ ते ४९ वयोगटातील ७० टक्के स्त्रिया मुली रक्तक्षयाने ग्रस्त असतात. अशिक्षित महिला वर्ग, अपुरे अन्न, आरोग्याकडे दुर्लक्ष अशी विविध कारणे कुपोषणासाठी कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे बाळंतपणात आईचे दूध म्हणजे बाळाचं सर्वांगीण पोषणच होय. बाळाच्या वेगवान वाढीसाठी उच्च दर्जाची प्रथिने, अमिनो अॅसिड्स, आेमेगा अॅसिड्स आणि कोलेस्टेरॉलचा समावेश असतो. लॅक्टोज आणि ग्लुकोज प्रकारची साखर, व्हिटॅमिन्स एडीईसी आणि क्षारांचासुद्धा समावेश असतो. अमायलेझयुक्त आहाराचा समावेश करावा: पूरकआहार देताना अमायलेझयुक्त आहाराचा समावेश करावा. त्यामुळे बाळाला पचायला मदत होते. तसेच इतर पोषक द्रव्ये बाळाला मिळत असतात. त्यामुळे प्रत्येक मातेने बाळाच्या स्वत:च्या खानपानावर विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या.
सजीना : बाजरीमोठे चमचे, मूग डाळ मोठा चमचा, गूळ मोठे चमचे, अमायलेझयुक्त फूड चमचा हे सर्व घटक भाजून, दळून घेऊन हवाबंद डब्यात भरून ठेवावे. त्यात अमायलेझयुक्त
फूडची पावडर मिसळावी. त्याचे द्रावण करून खायला द्यावे.
रागिना : नाचणीमोठे चमचे, हरभरा डाळ मोठा चमचा, गूळ मोठे चमचे, अमायलेझयुक्त फूड हे सर्व घटक भाजून, दळून घेऊन हवाबंद डब्यात भरून ठेवावे. त्यात अमायलेझयुक्त फूडची
पावडर मिसळावी. त्याचे द्रावण करून खायला द्यावे. ज्यामुळे पोष्टिक आहार मिळू शकेल.
गेहुना : गहूमोठे चमचे, मूग डाळ मोठा चमचा, शेंगदाणे चमचे, गूळ मोठे चमचे अमायलेझयुक्त फूड चमचा हे सर्व घटक भाजून, दळून घेऊन हवाबंद डब्यात भरून ठेवावे. त्यात
अमायलेझयुक्त फूडची पावडर मिसळावी. त्याचे द्रावण करून गरजेनुसार ते बाळाला खायला द्यावे.