आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुजन क्रांती मोर्चानिमित्त वाहतूक मार्गात बदल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला -  समाजात सलाेख्याचे वातावरण राहावे, प्रत्येकाला संविधानानुसार हक्क मिळावेत यासह एकूण ४३ मागण्यांसाठी रविवारी विराट बहुजन क्रांती आक्रोश माेर्चा काढण्यात येणार अाहे. 
 
सध्या काही ठिकाणी जाती-जातींमध्ये अविश्वास द्वेेषभावना पसरवण्याचे षडयंत्र रचण्यात येत अाहे. अशा परिस्थितीत जाती विरहित समाज व्यवस्था निर्माण करणे अावश्यक अाहे. यासाठी सर्व जाती, समूह, घटकांचे एकत्रीकरण करुन बहुजन समाजाने संघटीत हाेणे गरजेचे अाहे. बहुजन समाजाच्या हक्क अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ लढा देणे अावश्यक अाहे. यासाठी १५ जानेवारी राेजी बहुजन माेर्चा काढण्यात येणार अाहे. अाेबीसी, एससी, एसटी, व्हीजेएनटी, डीएनटी, बाैद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम, शिख, जैन, लिंगायत या समुहाचे बांधव क्रांती माेर्चाच्या निमित्ताने एकत्र येणार असल्याचे बहुजन क्रांती माेर्चा संयाेजन समितीतर्फे सांगण्यात अाले. 
माेर्चाला अकाेला क्रिकेट क्लब मैदानापासून सुरुवात हाेणार अाहे. सकाळी ११ वाजता प्रथम सभा हाेणार असून, त्यानंतर माेर्चाला प्रारंभ हाेणार असल्याचे सांगण्यात आले अाहे.
 
काेळीमहासंघ माळी महासंघाचा पाठिंबा 
१. बहुजनक्रांती माेर्चाला युवा काेळी महासंघाने पाठिंबा दिला अाहे. महासंघातर्फे बहुजन क्रांती माेर्चाच्या अायाेजकांना पत्र पाठवले अाहे. १९४९ मध्ये काेळी समाजाचा समावेश अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या सूचीमध्ये हाेता. मात्र, १९५६ मध्ये या सूचीवर बंदी घालण्यात अाली. त्यामुळे अाता संविधानिक हक्क मिळण्यासाठी बहुजन क्रांती माेर्चाला पाठिंबा देण्यात येत असल्याचे युवा काेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष तुषार शिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष गाैरव तराळे, सचिव सचिन रामाघरे यांनी पत्रात नमूद केले अाहे. 

२.बहुजनक्रांती माेर्चास अखिल भारतीय माळी महासंघाने पाठिंबा जाहीर केला अाहे. याबाबत महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव लिंगे, जिल्हाध्यक्ष सुभाष सातव, राजेंद्र महाडाेळे यांनी पत्र जारी केले अाहे. त्यांनी मागण्या पूर्ण अावश्यक असल्याचा उल्लेख केला अाहे. यामध्ये अाेबीसीची जातनिहाय जनगणणा झाली पाहिजे, पुणे येथील भिडेवाड्यात सावित्रीबाई फुले यांचे अांतरराष्ट्रीय स्मारक झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, मंडल अायाेग लागू करा, अॅट्राॅसिटी कायद्याची व्याप्ती वाढवून त्यामध्ये अाेबीसीमधील न्हावी, शिंपी, लाेहार, कुंभार, सुतार, धाेबी, कासार, साेनार, गवळी, काेळी, तेली यासारख्या जातींना संरक्षण मिळालेच पाहिजे, अाेबीसींसाठी कलम ३४० प्रमाणे तिसरी सूची करून लाेकसंख्येच्या प्रमाणात विधानसभा लाेकसभेत अारक्षण मिळालेच पाहिजे, महात्मा फुले यांचे मुंबई येथे अांतरराष्ट्रीय स्मारक झालेच पाहिजे अादींचा समावेश अाहे. 

कार्यकर्त्यांनी काढली मोर्चानिमित्ताने रॅली 
बहुजन क्रांती माेर्चाच्या निमित्ताने शनिवारी शहरातून माेटारसायकल रॅली काढण्यात अाली. रॅलीला अशाेक वाटिकेतून प्रारंभ झाला. रॅली मदनलाल धिंग्रा चाैक, अण्णाभाऊ साठे चाैक (रेल्वे स्टेशन), शिवाजी पार्क, टिळक राेड, लक्कडगंज, भीमनगर, डाबकी राेड, बाळापूर राेड या मार्गाने काढण्यात अाली. रॅलीचाि समाराेप वाशीम बायपास येथे करण्यात अाला. 

स्वयंसेवकांशी चर्चा 
विराट बहुजन क्रांती माेर्चासाठी ३५० पेक्षा जास्त स्वयंसेवकांची नियुक्ती केली अाहे. हे स्वयंसेवक माेर्चात विविध स्तरावर अापली जबाबदारी पार पाडणार अाहेत. स्वयंसेवकां शी संयाेजन समितीमधील पदाधिकाऱ्यांनी माेर्चातील नियाेजनाबाबत शुक्रवारी शनिवार, १४ जानेवारी रोजी चर्चाही केली. मोर्चादरम्यान कोणालाही असुविधेचा सामना करावा लागणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...