आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजरंग दलाकडून चिनी साहित्याची होळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - बजरंग दलाच्या वतीने शुक्रवारी, सप्टेंबर रोजी सायंकाळी गांधी चौकामध्ये चिनी साहित्याची होळी करण्यात आली. चीनची दादागिरी खपवून घेणार नाही, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. 
 
चीनच्या डोळ्यासमोर भारताचा भूभाग आहे. डोकलाममध्ये चिनी सैनिकांनी घुसून त्याठिकाणी भारतीय सैन्याशी झटापट केली. चीनने भारतीय भूभाग बळकावण्याचा प्रयत्न मुळीच करु नये, असा इशारा देण्यात आला. लोकांनी चिनी साहित्यावर बहिष्कार घालावा, सणासुदीच्या दिवसांमध्ये कोणीही चिनी सामान खरेदी करू नये, असे आवाहन करण्यात आले. 
 
या प्रसंगी बजरंग दल, विहिंपचे गणेश काळकर, सूरज भगेवार, प्रकाश घोगलिया, संजय रोहणकार, डॉ. प्रवीण चौहान, प्रताप विरवानी, दिनेश रत्नपारखी, हरीश मानकर, श्रीकृष्ण आखरे, शुभम डाहेत, किशोर आलिमचंदानी, अमर कुकरेजा, आदर्श इंगोले, रवी देशमाने, अहमदभाई चष्मेवाले, विजय डहाके, मनोज मानकर, अॅड. मनीष कोटवानी, सतपाल येललकार, संतोष वर्मा, नितेश मुर्डे, सागर पाटील, अविनाश कुमेरे उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...