आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

२९ कोटी ११ लाख रुपयांमधून साधला जाणार "ग्रामविकास'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - झेडपीचे २०१५-१६चे सुधारित सन २०१६-१७च्या मूळ अर्थसंकल्पाचे शिलकीचे अंदाजपत्रक अर्थ समिती सभापती राधिका धाबेकर यांनी मांडले. सुमारे २९ कोटी ११ लाखांतून "ग्रामविकास' साधला जाणार असून, समाजकल्याण कृषीच्या योजनांवर भर दिला आहे.
जि.प.च्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात २१ मार्च रोजी दुपारी अर्थसंकल्पीय सभा पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शरद गवई, उपाध्यक्ष गुलाम हुसेन गुलाम नबी देशमुख, समाजकल्याण सभापती गोदावरी जाधव, कृषी पशुसंवर्धन समिती सभापती रामदास मालवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी के. आर. तापी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. एम. कुळकर्णी अादी उपस्थित होते.

धाबेकर यांनी २०१६-१७ चा विभागनिहाय अर्थसंकल्पीय अंदाज तयार करताना प्रामुख्याने मूळ उपकर, वाढीव उपकर, उपकर सापेक्ष अनुदान मुद्रांक शुल्क अनुदान इतर प्राप्तीपासून जिल्हा परिषदेला ११ कोटी २६ लाख ५० हजार महसूलप्राप्ती भांडवली जमा रक्कम दोन कोटी ६७ लाख, असे १३ कोटी ९३ लाख ५० हजार रुपये प्राप्ती राहणार आहे. यामध्ये आरंभीची शिल्लक १५ कोटी १८ लाख ४६ हजार विचारात घेऊन २०१६-१७ या वर्षासाठी २९ कोटी ११ लाख ९६ हजार एवढी रक्कम हाती राहते. त्यानुसार २९ कोटी लाख ७२ हजार रुपये मूळ खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले अाहे. लाख २४ हजार रुपये शिल्लक राहत असल्याचे धाबेकर यांनी सांगितले. सदस्यांच्या सूचनेनुसार दुरुस्तीसह अंदाजपत्रकास मान्यता मिळाली.

काय म्हणाले सदस्य? : {विरोधी पक्ष नेते रमण जैन यांनी अल्पसंख्याकांना घरकुल द्या, असा मुद्दा उपस्थित केला. { गेल्या वर्षी बियाणे दिले नाही किमान या वर्षी तरी नक्की द्या, असे म्हणत सेना भाजपच्या सदस्यांनी टोला मारला. { शेतकरी आत्महत्या निवारण कार्यक्रमासाठी कोटी तरतूद करावी, असे मत चंद्रशेखर पांडे गुरुजींनी मांडले. { वाडेगावच्या महाजल योजनेत घोळ झाला असून, त्याची चौकशी करून अभियंता इंगळेवर कारवाई करा, अशी मागणी डॉ. हिंमतराव घाटोळ यांनी केली.
योजनाखर्च लाभार्थी
समाजकल्याण विभाग कोटी ६१ लाख ६१ हजार रुपये शेतकरी, अपंग प्रवर्ग
कृषी विभाग कोटी ९१ लाख ६९ हजार रुपये शेतकरी
महिला बालकल्याण कोटी ८४ लाख १४ हजार रुपये युवती महिला
आरोग्य विभाग ३५ लाख २७ हजार रुग्ण आयुर्वेद दवाखान्यात औषधी
बांधकाम विभाग कोटी १५ लाख १३ हजार रुपये रस्ते
पाणीपुरवठा विभाग ११ कोटी ५० लाख ५० हजार रुपये देखभाल दुरुस्ती
पशुसंवर्धन विभाग ५० लाख २० हजार रुपये शेतकरी
लघू पाटबंधारे १५ लाख ५१ हजार रुपये शेतकरी
जिल्हा परिषदेच्या सभेत बाेलताना सदस्य.
बातम्या आणखी आहेत...