आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकल्यांच्या वेशभूषेतून थोरांची महती, संमेलनात बालसाहित्यांची मांदियाळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- चिमुकल्यांनी साकारलेली विविध संत-महात्म्यांची वेशभूषा आणि मंत्रमुग्ध करणारे काव्य आणि पोवाड्यांच्या निनादात पाचव्या बालकुमार साहित्य संमेलनास अकोल्यात प्रारंभ झाला. यानिमित्ताने वाशीम रोड येथील प्रभात किड्स परिसरातील साने गुरुजी साहित्यनगरीत शुक्रवारी अनेक दिग्गजांची मांदियाळी भरली. संमेलनाध्यक्ष साहित्यिक शंकर कऱ्हाडे असून प्रा. ललिता काळपांडे या स्वागताध्यक्ष आहेत.  अभिनेत्री मेघना एरंडे यांची उद््घाटनास विशेष उपस्थिती होती. बाल साहित्य हे मराठी साहित्याची गंगोत्री आहे.  वयाच्या ८५ व्या वर्षी मिळालेला अध्यक्षाचा मान हा जणू सांजवेळी मिळालेला बहुमान आहे, असे उद््गार शंकर कऱ्हाडे यांनी या वेळी काढले.  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत...

बातम्या आणखी आहेत...