आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँका, सहकारी पतसंस्था सुरक्षेसंदर्भात "वा-यावर'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामोद - आदिवासी बहुल असलेल्या जामोद येथे राष्ट्रीयीकृत बँकेसह जिल्हा केंद्रीय बँकेची शाखा तसेच विविध पतसंस्था कार्यरत आहेत. या संस्थांच्या माध्यमातून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. परंतु, बँकेसह कोणत्याही पतसंस्थेत सीसीटीव्ही कॅमेरे किंवा सुरक्षा रक्षक कार्यरत नाहीत. त्यामुळे या संस्थांची सुरक्षा व्यवस्था वा-यावर आहे. एखादी अनुचित घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.

जामोद हे सुमारे २५ हजार लोकसंख्येचे गाव असून, जवळपासची २० ते २२ खेडी जोडलेली आहेत. या खेड्यांमधील नागरिक दररोज खरेदी-विक्री बँकांचे व्यवहार करण्यासाठी तसेच खेड्यापाड्यातील विद्यार्थीही शिक्षण घेण्यासाठी शहरात येतात. खेड्यापाड्यातील नागरिकांचे सर्व आर्थिक व्यवहार बँका पतसंस्थांमधून चालतात. सध्या शहरात नागरिकांसाठी विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक, जिल्हा केंद्रीय सहकारी बँक, बुलडाणा अर्बन आवजी सिद्ध सहकारी पतसंस्था कार्यरत आहे. मात्र, काही दिवसांपासून जिल्हा केंद्रीय बँक आर्थिकदृष्ट्या डबघाईस आल्यामुळे या शाखेत सुरक्षा रक्षक नसून कर्मचारीही थांबत नाहीत. त्यामुळे ही शाखा वा-यावर सापडली आहे. राष्ट्रीयीकृत असलेल्या ग्रामीण बँकेत जामोदसह ग्रामीण भागातील हजारो ग्राहकांचे खाते आहेत. दररोज या बँकेतून लाखो रुपयांची उलाढाल हाेत आहे. परंतु, या बँकेतही सुरक्षा रक्षक नसल्याचे दिसून येत आहे. बुलडाणा अर्बन पतसंस्थेचीही येथे शाखा आहे. व्यापारी, नोकरदार शेतक-यांचे आर्थिक व्यवहार या पतसंस्थेच्या माध्यमातून चालतात. मात्र, या ठिकाणीही सुरक्षा रक्षक तसेच सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. अशीच परिस्थिती आवजी सिद्ध सहकारी पतसंस्थेची आहे. दररोज कोट्यवधी रुपयाची आर्थिक उलाढाल करणा-या बँका पतसंस्थांमध्ये सुरक्षा रक्षक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याने या संस्थांची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली आहे. विश्वास असल्यामुळे अनेक नागरिक पतसंस्थांमध्ये ठेवी म्हणून पैसे ठेवतात. मात्र, आवश्यक सुरक्षा नसल्याने बँका, पतसंस्थांना धोका निर्माण झाला आहे.

सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक
गावासहपरिसरातील व्यावसायिक, नोकरदार शेतकरी त्यांचा आर्थिक व्यवहार बँका पतसंस्थांच्या माध्यमातून करतात. परंतु एकाही बँक पतसंस्थेत सीसीटीव्ही किंवा सुरक्षा रक्षक नसल्यामुळे ग्राहकांमध्ये असुरक्षततेची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे बँक आणि ग्राहकांच्या सुरक्षेसाठी बँकेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक आहे. सचिनहागे, खातेदार
सुरक्षा रक्षक आवश्यक

शहरासहपरिसरातील अनेक शेतक-यांचे ग्रामीण बँक आणि बुलडाणा अर्बनमध्ये खाते आहेत. सध्या दुष्काळसदृश परिस्थिती असल्यामुळे अनेक शेतकरी व्यवहार कर्ज काढण्यासाठी बँक पतसंस्थांमध्ये जातात. बँक पतसंस्थांमध्ये अनेक शेतक-यांच्या ठेवी आहेत. मात्र, तिथे सुरक्षा व्यवस्था नसल्याने नागरिकांमधून भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे जामोद येथील बँक आणि विविध पतसंस्थांनी किमान सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. हरिकिशन गांधी, शेतकरी
बातम्या आणखी आहेत...