आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँक, पतसंस्थांना बसेल व्याजाचा भुर्दंड, जुन्या नोटा पडून असल्याने उद्भभवले अजब संकट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - नोटबंदी केल्याने जिल्हा बँका आणि नागरी पतसंस्थांवर व्याजाचा नाहक भुर्दंड ओढवला आहे. नोटबंदीचा निर्णय घोषित होऊन महिना उलटला तरी िजल्हा बँका आणि पतसंस्थांमधील जुन्या नोटा तशाच पडून अाहेत. या काळात त्यांना हे चलन व्यवहारात आणता आले नाही. त्यामुळे त्या मोबदल्यात मिळणारे व्याजही मिळणार नाही. परंतु असे असले तरी ग्राहकांना मात्र व्याज द्यावेच लागणार आहे.

पाचशे हजार रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर ३० डिसेंबरपर्यंत त्या स्वीकारण्याची मुभा फक्त राष्ट्रीयकृत बँका तसेच टपाल विभागाला देण्यात आली. सहकाराचे जाळे विणणाऱ्या जिल्हामध्यवर्ती बँका आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्वाचा भाग ठरलेल्या पतसंस्थांना मात्र तसे करु दिले नाही. त्यामुळे निकट भविष्यात सदर बँका पतसंस्थांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.

जनधन योजनेचे लाभार्थी वगळता एकूण खातेदारांपैकी सुमारे निम्मे खातेदार जिल्हा बँका आणि पतसंस्थांशी निगडित अाहेत. यामध्ये ग्रामीण स्तरावरील शेतकरी, शेतमजूर, छोटे दुकानदार आणि स्वयंरोजगार करणारे व्यक्ती अशा सामान्यांचा समावेश आहे. या सर्वांच्या रकमा जिल्हा बँका पतसंस्थांमध्ये जमा आहेत. यातील बहुतेक चलन हे पाचशे हजार रुपयाचे असल्यामुळे संबंधित बँका-पतसंस्थांना ते बदलून घ्यावे लागणार आहे.

परंतु जिल्हा बँका पतसंस्थांवर असलेल्या बंदीमुळे गेल्या महिनाभरात अशा एकाही बँकेला छदाम सुद्धा बदलून मिळाला नाही. मुळात नोटबंदीमुळे ओढवलेली गर्दी लक्षात घेता एसबीआय रिजर्व बँकेला हे करण्यासाठी वेळच नाही, अशी स्‍िथती आहे. त्यामुळे महिनाभर पडून असलेल्या रकमेच्या सुरक्षेची जोखीम आणि त्या रकमेवरील व्याजाचा भुर्दंड संबंधित बँका आणि पतसंस्थांनाच सहन करावा लागणार आहे.

‘सीआरआर’ एवढीच आमच्याकडे रक्कम
नोटबंदीमुळेजिल्हाबँका पतसंस्था कोंडीत आल्या हे खरे आहे. परंतु अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत असलेली रक्कम ही सदैव राखून ठेवाव्या लागणाऱ्या ‘कॅश रिझर्व्ह रेशो’एवढीच (सीआरआर) असल्याने आमचे फारसे नुकसान होणार नाही. पतसंस्थांना कदािचत तो भुर्दंड सहन करावा लागेल. एकूण रकमेच्या चार टक्के रक्कम सीआरआर म्हणून राखून ठेवावी लागते.’’ अनंतवैद्य, सर व्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अकोला.

त्यांच्यावर दुहेरी खात्याचे संकट
शेती आणि शेतीशी संबंधित व्यवहारांमुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर जिल्हा बँका पतसंस्थांचे खातेदार आहेतच. दरम्यान शासनाच्या ताज्या निर्णयाचा फटका या सर्वांनाच बसला असून त्यांच्याकडील जुने चलन व्यवहारात आणण्यासाठी त्यांना आता राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खाती उघडावी लागणार आहे. दरम्यान, पाचशे हजार रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर ३० डिसेंबरपर्यंत त्या स्वीकारण्याची मुभा देण्यात अाली अाहे.
बातम्या आणखी आहेत...