आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकार, भाजपने रोवला झेंडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंजर - बार्शिटाकळी खरेदी विक्री संघाच्या झालेल्या निवडणुकीत धाबेकर गटाच्या बार्शिटाकळी तालुका शेतकरी संघर्ष समिती पॅनलने एकतर्फी विजय मिळवला. यापूर्वीसुद्धा याच गटाचे वर्चस्व होते.

सुनील पाटील धाबेकर यांच्या नेतृत्वात शेतकरी संघर्ष समितीने विजय मिळवला. या विजयामुळे पिंजर परिसरातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याचे संकेत दिसून येत आहेत. या निवडणुकीत एकूण १५ उमेदवारांपैकी वैयक्तिक मतदारसंघात गजानन आखरे यांना ८५१ मते, प्रकाश उपाध्ये ८००, सुधीर देशमुख ८२२, गजानन म्हैसने ९२४, अशोक राठोड ९०६, पुष्पा कावरे ९३०, मालूताई चांभारे ८७८, सुदर्शन भगत ९४७ मते, तर सोसायटी मतदारसंघातून विजय ठाकरे ४४, विनोद भुटे ५७, रमेश बेटकर ५१, उमराव चव्हाण ५०, रमेश वाटमारे ५५, विश्वंभर पाटील ४८, भास्कर काळे ५० मते घेऊन विजयी झाले. निवडणूक अधिकारी म्हणून साळुंके यांनी काम पाहिले. विजयी उमेदवारांची पिंजर येथे मिरवणूक काढण्यात आली. या वेळी सुनील धाबेकर, दामोदर काकड, पंजाबराव महल्ले अादी उपस्थित होते.
बाळापूर | तालुकासहकारी खरेदी विक्री प्रक्रिया संस्थेच्या दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनलचे दोन उमेदवार विजयी झाले. संस्थेच्या १६ पैकी १४ संचालकांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली असून, उर्वरित दोन जागांसाठी विठ्ठलराव ताथोड, विठ्ठलराव माळी ज्ञानेश्वर माळी हे तीन उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीत सर्व ३७ मतदारांनी मतदान केले. मतदानानंतर झालेल्या मतमोजणीत विठ्ठलराव ताथोड ३३, ज्ञानेश्वर माळी २६ मते घेत निवडून आले आहेत. तर विठ्ठलराव माळी यांना १३ मते मिळाली आहेत.

संपूर्णअकोला जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या तेल्हारा तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेच्या निवडणुकीत सहकार, भाजप, काँग्रेस शिवसेनाप्रणीत पॅनलचा दणदणीत विजय झाला असून, या पॅनलने १७ पैकी १६ जागांवर विजय मिळवला. शेतकरी, भारिप पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मिळावे लागले. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवारांची शहरातून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

तेल्हारा तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेच्या निवडणुकीत सहकार नेते सुरेशदादा तराळे यांच्या नेतृत्वात सहकार, भाजप, भारतीय काँग्रेस, शिवसेनाप्रणीत पॅनलने विजय मिळवला. या पॅनलचे संलग्न सहकारी संस्था मतदारसंघातून सहकार नेते पुंडलिकराव अरबट २४, किसनराव बोडखे १९, भानुदास चोपडे १८, भुजंगराव दुतोंडे २०, ज्ञानेश्वर कोरडे १९, श्रीराम कुकडे २०, सुदेश शेळके हे २० मतांनी विजयी झाले असून, शेतकरी भारिप पॅनलचे प्रभाकर खारोडे १७ यांचा ईश्वर चिठ्ठीद्वारे विजय झाला. तसेच या मतदारसंघात प्रभाकर खारोडे, अनिल बाजारे, विमल सांगुनवेढे ज्ञानेश्वर वाघोडे या चार उमेदवारांना समान १७ मते मिळाल्याने र्इश्वर चिठ्ठी काढण्यात आली होती.

वैयक्तिक भागधारक मतदारसंघातून सहकार भाजप पॅनलचे प्रकाश आढे १३३९, सुरेशचंद्र काळे १३९१, अनिल कराळे १२९२, पुंडलिकराव खारोडे १३७६ मतांनी विजयी, तर शेतकरी पॅनलचे रवींद्र बिहाडे ९६८, सुधाकर घंघाळ ८९१, अविनाश मनतकार ९६३, शेषराव पाथ्रीकर ९९१ हे पराभूत झाले. एससी, एसटी मतदारसंघातून सहकार पॅनलचे अशोक रेवस्कार १५४९ मते घेऊन विजयी झाले, शेतकरी पॅनलचे अंबादास चिमणकार यांना ९८४ मतांवर समाधान मानावे लागले. भटक्या जाती/ विमुक्त जमाती मतदारसंघातून सहकार भाजप पॅनलचे रामरतन सुशीर १४७५ मते घेऊन विजयी झाले, तर शेतकरी भारिप पॅनलचे सदानंद नवलकार यांना १०३५ मते मिळाली.
ओबीसी मतदारसंघातून सहकार पॅनलचे सुरेश ढोले १४५३ मते घेऊन या संस्थेत सहाव्यांदा विजयी झाले, शेतकरी पॅनलचे सुभाष खाडे यांना १०६० मते मिळाली. महिला राखीव मतदारसंघातून सहकार पॅनलच्या लता साहेबराव चिकटे १३८७, उषा बापुराव खारोडे १४१० मते घेत विजयी झाल्या, तर शेतकरी पॅनलच्या केसरबाई बोडखे १०५५, कुसुम मनोहर खुमकर १०२० मते यांचा पराभव झाला.

निकालानंतर काढलेल्या मिरवणुकीदरम्यान सुरेश ढोले, किसनराव बोडखे, सुरेश काळे, उषा खारोडे या संचालकांनी पुन्हा खरेदी विक्री संघामध्ये प्रवेश घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुधाकर डोंगरे यांनी काम पाहिले. या वेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांची तेल्हारा शहरातून मिरवणूक काढण्यात आली.