आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतरस्ता भ्रष्टाचार; बीडीओ बचुटे ताब्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगावमंजू - बोरगावमंजू येथील शेतरस्ता भ्रष्टाचारप्रकरणी अकोला पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी डॉ. देवीदास बचुटे यांना बोरगावमंजू पोलिसांनी शुक्रवार, १० जून रोजी सकाळी वाजता ताब्यात घेतले. तर कंत्राटी अधिकारी जानोरकर याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणातील आणखी दोन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचीही पोलिस चौकशी करणार आहेत.
सन २०११-२०१२, सन २०१४-२०१५ मध्ये शेतरस्त्यांना मान्यता मिळाली हाेती. गटविकास अधिकारी डॉ. देवीदास बचुटे यांना हाताशी धरून शेतरस्त्यांच्या कामावर वाढीव मूल्यांकन दर्शवून शाखा अभियंता प्रकाश रणबावरे, कंत्राटी अभियंता बागडे यांनी ३२ लाख ५५ हजार ३०५ रुपये मोजमाप पुस्तिकेवर दर्शवून रक्कम काढून अफरातफर केली. समितीने केलेल्या चौकशीत रस्त्याचे मूल्यांकन १३ लाख १४ हजार ८८६ रुपये आढळून आले. सहायक गटविकास अधिकारी पंडे यांच्या तक्रारीवरून शाखा अभियंता प्रकाश रणबावरे, ग्रामसेवक संदीप गवई, पालक तांत्रिक अधिकारी बागडे, ग्रामरोजगार सेवक गवई यांच्याविरुद्ध पोलिसांनी भादंविच्या कलम ४६७, ४६८, ४७१, ४७७, ४०९, ३४ अन्वये गुन्हे दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. यापैकी शाखा अभियंता रणबावरेंसह दोघांनी उच्च न्यायालयातून जामीन मिळवला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच मंगळवारी लेखाधिकारी गणेश गुंफालाल कहार आनंद रमेश जानोरकर या दोघांना अटक केली. या कारवाईला तीन दिवस उलटत नाही तोच अफरातफर प्रकरणातील म्होरक्या असलेलेे तत्कालीन गटविकास अधिकारी डॉ. देवीदास बचुटेंना पोलिसांनी शुक्रवारी सकाळी ताब्यात घेतल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. डॉ. बचुटे यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचीही पोलिस चौकशी करणार आहेत.

कर्मचारी संपावर
महाराष्ट्रग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कार्यरत असलेले कंत्राटी अधिकारी आनंद जानोरकर यांच्यावरील कारवाईविरोधात रोजगार हमी योजनेच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यावर अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही.

बचुटेसमोर अडचण
वाशीम येथे कार्यरत गटविकास अधिकारी डॉ. देवीदास बचुटे यांना ताब्यात घेतल्याने त्यांच्या बढतीसंदर्भात कारकिर्दीबाबत अडचण निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अकोला पंचायत समितीत केलेल्या गौण खनिजाच्या कागदपत्र तपासणीतही ते दोषी आढळले होते. त्यांच्याकडून २५ लाख रुपये वसूल करण्यात आले होते. डॉ. बचुटे हे वर्ग दर्जाचे अधिकारी होते. आता बोरगावमंजू शेतरस्ता प्रकरणात ते दोषी आढळले आहेत.
बातम्या आणखी आहेत...