आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सव काळात पोलिसांनी दक्ष राहावे, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने दक्ष राहावे, असे आदेश गृहराज्यमंत्री, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले आहेत.गणेशोत्सव, दुर्गोत्सव हे सण शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस विभागाने बंदोबस्त चोख ठेवावा. शहरातील संवेदनशील भागाकडे विशेष लक्ष द्यावे. सातत्याने गुन्हे घडणारे भाग शोधून त्या ठिकाणी आधीच उपाययोजना कराव्यात. संवेदनशील भागातून घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजावेत. शहरातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली राहण्यासाठी गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणे तातडीने मार्गी लावावीत प्रतिबंधात्मक कारवाई तत्काळ करावी, असे आदेश त्यांनी जिल्हा पोलिस प्रशासनाला दिले आहेत.

जिल्ह्याततगडा बंदोबस्त : गणेशाेत्सवादरम्यानजिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस विभागातर्फे जिल्ह्यासह शहरामध्ये तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. सीआरपीएफची कंपनी, एक एसआरपीची कंपनी शहरात रविवारीच दाखल झाली. जिल्ह्यातील संवेदनशील तालुके, शहरातील अतिसंवेदनशील ठिकाणी फिक्स पॉइंट लावले आहेत, तर संवेदनशील भागावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. सीआरपीएफची कंपनी, अमरावती येथून एसआरपीची कंपनी शहरात दाखल झाली आहे. या बंदोबस्तासाठी पाेलिस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक, अतिरिक्त पोलिस कर्मचारी, महिला अधिकारी, पुरुष महिला होमगार्ड तैनात ठेवले आहेत. रविवारी मूर्तिजापूर, अकोट पातूर येथे एसआरपीचे काही जवान पाठवले आहेत. कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस अधीक्षकांनी सर्व ठाणेदारांना दिशानिर्देश दिले आहेत.
बातम्या आणखी आहेत...