आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मांस घेऊन जाणाऱ्या वाहनाला पकडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - हिवरखेड येथून मांस मोठ्या प्रमाणात येत असल्याची माहिती अकोट शहर पाेलिसांच्या डीबी पथकाला मिळाली. पाळत ठेवून पथकाने मिनीट्रक पकडला. यामध्ये पोत्यात भरलेले मांस आढळून आले. पोलिसांनी या वेळी दीड लाखांच्या मुद्देमालासह दोन जणांना अटक केली आहे.
मांस वाहतुकीवर बंदी असताना राजरोपणे वाहतूक सुरूच आहे. हिवरखेड परिसरात सहजच मांस मिळत असल्याने या भागात कसाईंना रान मोकळे झाल्यासारखे असल्याचा आरोप होत आहे. हिवरखेड येथून मांस येत असल्याची गोपनीय माहिती डीबी पथकाला मिळाली. त्यावरून पोलिसांनी अकोट येथील हिवरखेड टी पॉइंटवर नाकाबंदी केली. मालवाहू एमएच ०२, वायए ३५६२ या क्रमांकाच्या टाटा मॅजिक वाहनाला थांबवून तपासणी केली. या वेळी पोत्यात भरलेले मांस आढळून आले. या पोत्यावर ताडपत्री असल्याने सहजासहजी मांस असल्याचा अंदाज येत नव्हता. मात्र, पोलिसांनी बारीक तपासणी करून मांस जप्त केले. तब्बल ४५० किलो मांस, वाहनासह दीड लाखांचा मुद्देमाल पाेलिसांनी ताब्यात घेतला. हिवरखेड येथील चंडीका चौक पेठपुरा भागात राहणारा अफरोज अहेमद अब्दुल सत्तार, वय २६ वर्ष तिडकेनगर हिवरखेड येथील मकसुद खाँ याकुब खाँ, वय २१ वर्ष या दोघांना अटक केली. ही कारवाई ठाणेदार कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय मयुर चौरसीया, हेड कॉन्स्टेबल यशवंत शिंदे, वासुदेव ठोसरे, रोहीत तिवारी, गुड्डू पठाण, राहुल वाघ, मंगेश खेळकर यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...