आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Beer, 1.50 Crores Goods Recovered, Three Arrested

बीअरसह दीड कोटींचा माल जप्त - तिघांना अटक, दोन दिवसांचा पीसीआर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: अाराेपींसह पकडण्यात अालेले बीअरचे ट्रक.
अकोला - आंध प्रदेशातील तेलंगणा येथून आणलेल्या बीअरचे तीन ट्रक नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजीजवळील धाब्याजवळ ३१ ऑक्टोबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्य नियंत्रण पथकाने दुपारी पकडले. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. आरोपींना शनिवारी अकोला न्यायालयात हजर केले असता दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.

राष्ट्रीय महामार्गावरून परराज्यांतील देशी दारू बीअरचे ट्रक येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर आयुक्त विजयकुमार सिंघल संचालक पी. जी. शेखर यांच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्य भरारी पथकाचे निरीक्षक सुभाष जाधव मुुकुंद बिलोलीकर यांच्या मार्गदर्शनात दुय्यम निरीक्षक डिगांबर शेवाळे यांनी वडनेर भोलजीनजीक सापळा रचला. तीन ट्रक एका धाब्यावर आले असता त्यांची तपासणी केली. त्यात हरियाणा सेलची बीअर महाराष्ट्रात विकण्यासाठी आणली असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
ट्रक क्रमांक एचआर ५५ - के. २३८६, आरजे १४ - सीजी ७२६ डीएल ०१ - ३६४५ ची तपासणी केली असता त्यात प्रत्येकी १,१५० प्रमाणे ३,४५० बॉक्स बीअरचे आढळून आले. त्यावर फॉर हरियाणा सेल असे लिहिले होते. त्यांच्याकडे विक्री परवाना आढळून आला नाही. गुडगावला हे ट्रक घेऊन जात असल्याचे दुय्यम निरीक्षक डिगांबर शेवाळे यांनी सांगितले. तिन्ही ट्रक जप्त करण्यात आले अाहे. ७३ लाखांच्या बिअरसह सुमारे कोटी १८ लाख ४८,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक डिगांबर शेवाळे करीत असून, ही कारवाई जवान धनंजय भदरगे, झाडे, उदय शिंदे, डी. पाटील, खैरनारे यांनी केली. याप्रकरणी कमलराजसिंग, मनोज कुमार अवतारसिंग जोगेंरदरसिंग मेहता या तिघांना अटक केली असून, शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तिन्ही आरोपींना न्यायालयाने दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.