आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

7 सुवर्णांसह मुंबई विभागाला मिळाले स्पर्धेत सांघिक जेतेपद; अकोल्याच्या दियाला बेस्ट बॉक्सरचा पुरस्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- वसंत देसाई स्टेडीयम येथील बहुउद्देशीय सभागृहात सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत गुरूवार, २३ नोव्हेंबर रोजी १७ १९ वर्ष वयोगटातील मुलींचे अंतिम सामने रंगले. विविध वजन गटात झालेल्या या सामन्यांमध्ये मुंबई विभागातील खेळाडूंनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत सर्वाधीक 7 सुवर्ण पदक पटकावले. १७ वर्ष वयोगटात तर १९ वर्ष वयोगटात असे खेळाडूंनी सुवर्ण पदक पटकावत सांघिक जेतेपद प्राप्त केले. या पाठोपाठ कोल्हापूर विभागाला ५, नागपूर विभाग अकोला क्रिडा प्रबोधिनीला ४, पुणे विभागाला तर नाशिक औरंगाबाद विभागाने प्रत्येक सुवर्ण पदक प्राप्त केले. तर लातूर विभागातील एका खेळाडूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. 


क्रिडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १८ ते २३ नोव्हेंबर दरम्यान ही राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील अमरावती, नागपूर, पुणे, मुंबई, लातूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिव क्रीडापीठ अशा एकूण विभागातील २३७ मुली ३१५ मुले असे एकूण ५५२ खेळाडू सहभागी झाले आहेत. २१ नोव्हेंबर पासून १७ १९ वर्ष वयोगटातील मुलींचे सामने सुरू आहेत. मुलींच्या विविध वजन गटात झालेल्या सामन्यांमध्ये सर्वच खेळाडूंनी दमदार खेळाचे प्रदर्शन केले. सुवर्ण, रौप्य पदक प्राप्त करण्यासोबतच बेस्ट बॉक्सर बेस्ट फाईटर हे पुरस्कार देऊन खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. १७ वर्ष वयोगटात बेस्ट बॉक्सर म्हणून नागपूर विभागातील अल्फीया पठाण, बेस्ट चॅलेंजर म्हणून मुंबई विभागाची जया सावंत यांना पुरस्कार देण्यात आला. तर १९ वर्ष वयोगटात बेस्ट बॉक्सर म्हणून अकोला क्रीडा प्रबोधिनीची दिया बचे, बेस्ट चॅलेंजर म्हणून पुणे विभागाची श्रुती पवार या खेळाडूंना पुरस्कार देण्यात आला. 


१७ वर्ष वयोगटात ४२ किलो वजन गटात कोल्हापूरची दिशा पाटील, ४४ किलो मध्ये कोल्हापूरची स्वप्ना चव्हाण, ४६ किलो मध्ये मुंबईची तिर्था देवळेकर, ४८ किलो मध्ये नाशिकची लक्ष्मी पाटील, ५० किलो मध्ये मुंबईची सिमरन वर्मा, ५२ किलो मध्ये कोल्हापूरची प्रिती बानेकर, ५४ किलो मध्ये मुंबईची दिव्या राणे, ५७ किलो मध्ये औरंगाबादची वैभवी सहाने, ६० किलो मध्ये पुणेची सई डावखरे, ६३ किलो मध्ये मुंबईची सुप्रिया मिश्रा , ६६ किलो मध्ये नागपूरची मानसी निमजे, ७० किलो मध्ये क्रिडा प्रबोधिनीची विधी रावल, ७५ किलो मध्ये औरंगाबादची हिरल मखवाना, ८० किलो मध्ये मुंबईची वंशिका भार्गव, ८० पेक्षा अधिक किलो वजन गटात नागपूरची अल्फिया पठाण यांनी सुवर्ण पदक प्राप्त केले. 


१९ वर्ष वयोगटात ४५ किलो वजन गटात क्रीडा प्रबोधिनीची गौरी जयसिंगपुरे, ४८ किलो मध्ये कोल्हापूरची यशश्री दनवडे, ५१ किलो वजन गटात नागपूरची संगिता रुमाले, ५४ किलो मध्ये क्रिडा प्रबोधिनीची दिया बचे, ५७ किलो मध्ये मुंबईची प्राची पाटील, ६० किलो मध्ये पुण्याची संस्कृती सुर्वे, ६३ किलो मध्ये पुणे विभागातील निकीता रोकडे, ६६ किलो मध्ये कोल्हापूरची अलिशा नाईकवडे, ६९ किलो मध्ये मुंबईची सोमी सिंग, ७५ किलो मध्ये क्रीडा प्रबोधिनीची साक्षी गायधनी, ८१ किलो मध्ये नाशिकची विनिता उगवकर, ८१ पेक्षा अधिक किलो वजन गटात नागपूरची जुई नखाते यांनी विजय पटकावत सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरल्या. विजयी खेळाडूंना पदक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा स्त्री रुग्णालयातील शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, डॉ. कृष्णकुमार शर्मा, अॅड. विजय शर्मा, विजय गोटे, मुलजी कोली, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन स्पर्धेचे संयोजक राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट यांनी केले. 

 

हे आहेत पंच 
१८ ते २३ नोव्हेंबर दरम्यान सुरू असलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत पंच म्हणून विजय गोटे, मुलजी कोळी, दिनेश छबने, ऋषिकेश वायचळ, ऋषिकेश टाकळकर, अजीत ओसवाल, सुधीर ओहळ, आमल सैय्यद, सुनील तराडे, महेश मिलेकर, संपत साळुंखे, प्रशांत प्रजापती, तिर्थनाथ गाधवे, अक्षय टेंभुर्णीकर,विशाल सुनारीवाल, शे.अंजार, सतीश प्रधान, वंदना पिंपळखरे, शिल्पा गायधनी, प्रगती करवाडे, सपना विरघट, रविंद्र माली, मिलींद पवार, शंकर सिंग, प्रमोद सुरवाडे, अजय जयवाल, विक्रमसिंग चंदेल हे काम पाहत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...