आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारिप-बमसंचा ५, भाजप-सेना युतीचा पंचायत समितींवर झेंडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - पंचायत समिती सभापती-उपसभापती पदासाठीची निवड प्रक्रिया मंगळवारी पार पडली. जिल्ह्यात कुठेही सत्तापरिवर्तन झाले नाही, सातपैकी पंचायत समित्यांवर सत्ताधारी भारिप-बमसंचा झेंडा फडकला असून, अकाेला शिवसेना मूर्तिजापूर पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व कायम राहिले. काँग्रेसला पंचायत समितींच्या उपसभापतिपदांवर समाधान मानावे लागले. सभापतिपदाचे अारक्षण २३ जून राेजी जाहीर करण्यात अाले हाेते. अकाेला-एसी, अकाेट-सर्वसाधारण, तेल्हारा-सर्वसाधारण महिला, पातूर -एससी (महिला), बार्शिटाकळी-एसटी (महिला), मूर्तिजापूर-नागरिकांचा मागास प्रवर्ग, बाळापूर-ना. मा. प्र.साठी (महिला) राखीव असल्याचे जाहीर केले हाेते.

भारिप-बमसं, शिवसेना, भाजपने पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले. मंगळवारी पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी ११ वाजतापासून प्रक्रियेला प्रारंभ झाला. अर्ज दाखल झाल्यानंतर छाननी झाली. दुपारी वाजतानंतर सभापती-उपसभापती पदाचा निकाल तहसीलदारांनी जाहीर केला. तेल्हारा पंचायत समितीच्या सभापतिपदी अाशा इंगळे उपसभापतिपदी सचिन झापर्डे (दाेन्ही भारिप-बमसं) हे विजयी झाले. मूर्तिजापूरला सभापतिपदी भाजपच्या भावना सदार, तर उपसभापतिपदी काँग्रेसचे उमेश मडगे विजयी झाले. बार्शिटाकळी सभापतिपदी भारिप-बमसंचे भीमराव पावले, तर उपसभापतिपदाची माळ काँग्रेसचे सतीश पवार यांच्या गळ्यात पडली. बाळापूर सभापतिपदी भारिप-बमसंच्या मंगला तितूर, तर उपसभापतिपदी काँग्रेसच्या अनिता बी शेख फ‍िराेज विजयी झाल्या. पातूरच्या सभापतिपदी सविता धाडसे, तर उपसभापती नईमा बानाे शेख माेबीन (दाेन्ही भारिप-बमसं) यांची निवड झाली. अकाेट सभापतिपदी भारिप-बमसंच्या अाशा एखे, तर उपसभापतिपदी सूर्यकांता घनबहादूर यांची वर्णी लागली.
बातम्या आणखी आहेत...