आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभापतीपदांवर भारिपचे वर्चस्व, महाआघाडीचा उडाला निवडणुकीमध्ये धुव्वा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर बुधवारी झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीतही भारिप-बमसंने बाजी मारली. दाेन सभापती भारिप-बमसंचे, तर दाेन पदांवर अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारिप-बमसंला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या प्रत्येकी एक सदस्याचा विजय झाला. समाजकल्याण सभापतीपदी रेखा अंभाेरे, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी देवकाबाई पाताेंड, विषय समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुंडलिकराव अरबट शिवसेनेच्या माधुरी गावंडे विजयी झाल्या.
बुधवारी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात सभापतीपदाच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला. महिला बालकल्याण सभापतीपदासाठी देवकाबाई पाताेंड (भारिप-बमसं), माया कावरे (भाजप), मंजुुळा लंगाेटे (काँग्रेस), दीपिका अढाऊ (शिवसेना) यांनी अर्ज सादर केले. समाजकल्याण सभापतीपदासाठी रेखा अंभाेरे (भारिप-बमसं), निकिता रेड्डी (भाजप), पद्मावती भाेसले यांनी अर्ज सादर केले. विषय समितीच्या दाेन सभापतीपदांसाठी पुंडलिकराव अरबट, रमण जैन, माधुरी गावंडे, हिम्मतराव घाटाेळ, रामकृष्ण बाेंद्रे, मंजुुळा लंगाेटे, रामदास लांडे मनाेहरराव हरणे यांनी अर्ज केले. काहींनी अर्ज मागे घेतले. दुपारी वाजता प्रत्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. निवडणुकीचा निकाल उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी जाहीर केला. निवडणूक प्रक्रियेत तहसीलदार डाॅ. रामेश्वर पुरी, नायब तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. एम. कुळकर्णी, मंडळ अधिकारी गावंडे, संतोष इंगळे, मोहन नाईक, नायब तहसीलदार रवी राठाेड यांनी सहकार्य केले.
िवजयींनायांनी केले मतदान : सभापतीपदाच्यािनवडणुकीत भारिपच्या विजयी उमेदवारांना िवजय लव्हाळे, शरद गवई, रामदास मालवे, राजेश खाेने (अपक्ष), गुलाम देशमुख, संध्या वाघाेडे, शबाना खातून, अनिता अाखरे, माधुरी गावंडे, रमीझा बी शेख साबीर, मंजुषा वडदकार, गाेदावरी जाधव, मंदा डाबेराव, सरला मेश्राम, देवकाबाई पाताेंड, गीता राठाेड, वेणू चव्हाण, शाेभा शेळके, रेखा अंभाेरे, द्राेपदाबाई वाहाेकार, प्रतिभा अवचार, दामाेदर जगताप, गाेपाल काेल्हे, पुंडलिकराव अरबट, जामीर खान, देवानंद गणाेरकर, संजय आष्टीकर यांनी मतदान केले.
पराभूतांनायांनी केले मतदान : सभापतीच्यािनवडणुकीत पराभूत झालेल्या महाअाघाडीच्या उमेदवारांना अहिल्या गावंडे, सुनीता गाेरे, पद्मावती गाेसले, बाळकृष्ण बाेंद्रे, िहम्मतराव घाटाेळ, मंजुळा लंगाेटे, राधिका पाटील, िनतीन देशमुख, महादेव गवळे, ज्याेत्स्ना चाेरे, रामदास लांडे, चंद्रशेखर पांडे, संताेष वाकाेडे, अक्षय लहाने, रमन जैन, मनाेहर हरणे, गजानन उंबरकार, ज्याेत्स्ना बहाळे, रेणुका दातकर, दीपिका अढाऊ माधुरी कपले यांनी मतदान केले.
हेझाले विजयी : समाजकल्याणसभापती निवडणुकीत भारिपच्या रेखा अंभाेरे यांना २७, तर भाजपच्या निकिता रेड्डी यांना २४ मते मिळाली. महिला बालकल्याण सभापतीपदाच्या निवडणुकीत भारिपच्या देवकाबाई पाताेंड यांना २७, तर भाजपच्या माया कावरे यांना २४ मते मिळाली. विषय समिती सभापतीसाठी राकाँचे पुंडलिकराव अरबट यांना २८ मते, काँग्रेसचे बाळकृष्ण बाेंद्रे-२३, शिवसेनेच्या माधुरी गावंडे-२८ काँग्रेसच्या मंजुळा लंगाेटे यांना २३ मते मिळाली.
अशीमिळाली पक्षांची मते : समाजकल्याणमहिला बालकल्याण सभापतीपदाच्या निवडणुकीत भारिप-बमसं उमेदवारांना २७ मते महाअाघाडीच्या उमेदवारांना २४ मते मिळाली.
ते माझे वैयक्तिक संबंध; मी तर शिवसैनिकच
जखमी भाजप सदस्य पाेहाेचले सभागृहात
भाजपचेसदस्य विलास इंगळे हे अकाेल्याकडे येत असताना त्यांच्या वाहनाला उरळ राेडवर अपघात झाला. यात ते िकरकाेळ जखमी झाले. त्यानंतर कारने ते थेट िजल्हा परिषदेत अाले. त्यांनी कार सभागृहाच्या पायऱ्यांपर्यंत अाणली. दाेन कार्यकर्त्यांच्या मदतीने ते सभागृहात अाले.
सभापतीपदाच्या निवडणुकीत मी शिवसेना भाजपच्या उमेदवारांना मतदान केले. निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करण्याचा प्रश्नच नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुंडलिकराव अरबट यांच्याशी माझे वैयक्तिक संबंध असल्याने विषय समितीच्या निवडणुकीत मी त्यांना मतदान केले.'' चंद्रशेखर पांडे, सदस्य, जिल्हा परिषद
पांडे गुरुजींनी खेळली अशी खेळी
अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाअाघाडीच्या उमेदवारांना मतदान केल्याने शिवसेना सदस्य चंद्रशेखर पांडे (गुरुजी) यांना पक्षाने उपजिल्हाप्रमुख पदावरून हटवल्यानंतर त्यांनी सभापतीपदाच्या निवडणुकीत साेयीची खेळी खेळली. त्यांनी विषय समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या माधुरी गावंडे यांना मतदान केले. वास्तविक गावंडे यांनी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत भारिपला पाठिंबा दिल्याने त्यांना सभापतीपद देऊन भारिपने परतफेड केली. समाजकल्याण सभापती निवडणुकीत चंद्रशेखर पांडे यांनी भारिपच्या उमेदवाराला नव्हे, भाजपच्या उमेदवाराला मतदान केले. विषय समितीच्या निवडणुकीतही त्यांनी काँग्रेसएेवजी शिवसेना, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केले.
बातम्या आणखी आहेत...