आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी चोरणारा शिक्षक गजाआड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शहरातील एका नर्सिंग स्कूलमध्ये विद्यादानाचे काम करणारा शिक्षक वाहनचोरीचा गोरखधंदा करत असल्याचे गुरुवारी समोर आले. त्याच्याकडून पोलिसांनी सहा दुचाकी जप्त केल्या. रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिस ठाण्यात त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरु होती. 

रॉबीनसन बोर्डे असे या शिक्षकाचे नाव आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे ठाणेदार शिरीष खंडारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी रॉबीनसन बोर्डे याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. त्याने चोरलेल्या सहा दुचाकी दिल्या. या दुचाकी त्याने वेगवेगळ्या मित्रांकडे ठेवल्या होत्या. पोलिसांनी त्याच्या मानेगाव येथील एका मित्रालाही ताब्यात घेतले आहे. या दोघांनी शहरातील विविध भागातून दुचाकी चोरल्याचे समोर आहे. शिक्षक असल्यामुळे त्याच्यावर कुणीही संशय करत नसल्याचा फायदा घेत त्याने दुचाकी चोरीचा गोरखधंदा सुरु केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

नंबर बदलवले 
अलीकडेचविकत घेतलेल्या दुचाकी चोरल्या. त्या ओळखल्या जाऊ नये म्हणून त्यांनी त्यांचे नंबर बदलवले. पोलिसांना आता चेसिस नंबरवरून, कोणत्या भागातून चोरट्यांनी दुचाकी चोरल्या यावरून दुचाकीमालक शोधावे लागणार आहेत. 

आणखी दुचाकी मिळण्याची शक्यता 
आरोपीकडून पोलिसांनी एकाच दिवसात सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. या आरोपीकडून आणखी दुचाकी मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...