आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकाेला - स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) विविध चाेरीप्रकरणी तीन अाराेपींकडून शुक्रवारी 2 लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अाहे.चाेरटे चाेरलेल्या दुचाकींची नंबर प्लेट बदलून वापरत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली असून, पोलिस या अाराेपींची कसून चाैकशी करीत अाहेत.
जिल्ह्यात चाेरीच्या घटना वाढल्या असून, पोलिसांच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले अाहे. अशीच चाेरीची घटना नोव्हेंबरला सिव्हील लाईन्स पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली हाेती. शेखर मेश्राम यांनी त्यांची दुचाकी जवाहर नगर चाैक परिसरात उभी केली हाेती. मात्र नंतर ही दुचाकी चाेरी गेली.
याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला. याप्रकरणी एलसीबीने परिसरातील सिसी टिव्ही कॅमेरातील फुटेज तपासले. त्यानंतर पोलिसांनी १४ नोव्हेंबर राेजी सिद्धांत देवराव वानखडे, विजय रामराव राठाेड (रा. कातखेड, तालुका बार्शीटाकळी) यांना अटक केली. त्यानंतर या दाेघांच्या चाैकशीनंतर सचिन उर्फ कालू भाऊसाहेब वानखडे (वय २८, रा. कातखेड ) याला गुरुवारी अटक केली. अाराेपी सोमवारपर्यंत पोलिस काेठडीत असून त्यांची चाैकशी सुरु अाहे.
हे साहित्य केले जप्त : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अाराेपींकडून 2 लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जपत केला अाहे. यामध्ये चार दुचाकी, एक जनरेटर, ट्रकचे दाेन टायरचा समावेश अाहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक राजेश कलासागर अपर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर एसलसीबीचे प्रमुख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रणजितसिंह ठाकूर, नापाेकाॅं राजेश वानखडे, शक्ती कांबळे, अमित दुबे, मनाेज नागमते, संदीप तवाडे, संताेष मेंढे, मंगेश मदनकार, विजय मुलनकर अादींनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.