आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला-म्हैसांग रस्त्यावर दुचाकींची समाेरासमोर धडक; एक जण गंभीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍मक फोटो - Divya Marathi
प्रतिकात्‍मक फोटो
अकोला- बोरगावमंजू पोलिस ठाण्यांतर्गतच्या अकोला-म्हैसांग रस्त्यावर कौलखेड गोमासे फाटा टी पॉइंटवर २३ सप्टेंबर रोजी दुपारी वाजता दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या धडकेत कौलखेड गोमासे येथील वैभव रामकृष्ण गोमासे वय २० वर्षे हा गंभीर जखमी झाला आहे.

वैभव गोमासे हा आपातापा येथे बाजारासाठी दुचाकी क्र. एमएच ३० झेड ८५७५ ने जात होता. तो कौलखेड गोमासे फाटा टी पाॅइंटजवळ आला असता समोरून येणाऱ्या दुचाकी क्र. एमएच २७ डब्लू ९०४१ ची धडक बसली. त्यामध्ये वैभव गंभीर जखमी झाला. त्याला आपातापा येथील आरोग्य केंद्रात आणल्यानंतर रुग्णवाहिका वेळेवर मिळू शकली नाही. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण झाल्याने पोलिस तंटामुक्ती अध्यक्ष हिंमत गोमासे, कमलाकर बोपटे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. अखेर डॉ. अशोक देशमुख यांनी स्वत:च्या वाहनात त्याला पुढील उपचाराकरिता अकोला येथे पाठवले.घटनेची माहिती मिळताच बीट जमादार जनार्दन चंदन, पोलिस कॉन्स्टेबल सातव, जुनगडे यांनी घटनास्थळावर धाव घेतली.