आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार, झेडपी अध्यक्षांच्या गावातून बायोगॅस प्लांट चोरीला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जाऊ तिथं खाऊ चित्रपटात विहीर चाेरीला जाण्याचा किस्सा सगळ्यांनीच पाहिला अाहे. असाच किस्सा खासदार झेडपीचे अध्यक्ष यांच्या पळसो बढे गावात घडला. २०१२ मध्ये कागदाेपत्री बनलेले बायोगॅस प्रकल्प अाता चाेरीला गेले अाहे. कागदावर प्रकल्पाचे लाभार्थी असलेले ग्रामस्थ मंगळवारी पाेलिसात तक्रार देणार अाहे.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत बायोगॅस संयंत्रासाठी २०१२ मध्ये अर्ज बोलावले होते. पुढील महिन्यात निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी लागेल, अशा प्रतीक्षेत तब्बल चार वर्षे उलटली. मात्र, यादी जाहीर केली नाही. योजनेत समाविष्ट झालेल्या लाभार्थ्यांना आपले नाव समाविष्ट झाल्याची माहितीसुद्धा दिली नाही. अचानक एप्रिल महिन्यात जिल्हा परिषदेच्या वेबसाइटवर १२ लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली. एवढेच नाही तर गेल्या चार वर्षांत या योजनेचा कुणालाही थांगपत्ता नव्हता. अचानक २०१६ मध्ये यादी जाहीर केल्याने संबंधित लाभार्थ्यांना धक्काच बसला. प्रत्यक्षात यापैकी एकाही लाभार्थ्याला लेखी कळवण्यात आले नाही. दरम्यान, एप्रिल रोजी अचानक ग्रामपंचायत प्रशासनाने लाभार्थ्यांना पत्र दिले की, ग्रामपंचायतीने सन २०११- १२ मध्ये राष्ट्रीय बायोगॅस योजनेअंतर्गत संयंत्र बांधकामाबाबत पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केले होते. मात्र, प्रत्यक्ष चाैकशी केली असता कोणतेही बांधकाम झालेले नाही. त्यामुळे पंचायत समितीकडून लाभार्थ्यांना धनादेश वितरित केले नाही. आता १५ दिवसांच्या आत बायोगॅस संयंत्राचे बांधकाम पूर्ण करून फोटोसह अहवाल सादर करा, नाहीतर संबंधित अनुदान शासन खाती जमा केले जाईल, असे लाभार्थ्यांना कळवण्यात आले आहे. हे पत्र पाहून लाभार्थ्यांना धक्काच बसला आहे. या लाभार्थ्यांमध्ये रामकृष्ण सदाशिव रेवस्कर, राजेश शालिग्राम रेवस्कर यांच्यासह १२ जणांचा समावेश आहे.

म्हणे, १५ दिवसांत बांधकाम करा : पळसोबढेचे सरपंच ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सहीनिशी लाभार्थ्यांना पत्र पाठवून बायोगॅस संयंत्राचे १५ दिवसांत बांधकाम करण्याची सूचना केली आहे. आतापर्यंत का कळवले नाही, असा सवाल लाभार्थ्यांनी उपस्थित केला.

फसवणूकप्रकरणी पोलिसात जाणार
^हे प्रकरण गंभीर असून, लाभार्थ्यांची फसवणूक झाली आहे. मी स्वत: अकोला पंचायत समितीत दोन वर्षांपासून विचारणा करत आहे. मात्र, कुणीही काहीही सांगितले नाही. अधिकाऱ्यांनी दिशाभूल केली. अधिकारी आँचल सूद यांनी पाठपुरावा केला तेव्हा पितळ उघडे पडले. पैसे लाटण्याचा संबंधितांचा प्रयत्न होता. याप्रकरणी पोलिसात दाद मागणार.'' हितेशजामनिक, सदस्यपळसो बढे