आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायाेमेट्रिक मशीन नादुरुस्त; माहिती अनुपलब्ध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी - अन्न अाैषध प्रशासन कार्यालयातील बायाेमेट्रिक अटेंडन्स मशीनमधील रेकाॅर्ड उपलब्ध नसल्याचा प्रकार माहिती अधिकारान्वये मिळालेल्या दस्तऐवजातून उजेडात अाला अाहे.

अाैषधी व्यावसायिक अंजुल जैन यांनी अन्न अाैषध प्रशासनाच्या सह अायुक्तांकडे अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसल्याची तक्रार केली हाेती. साेमवार या अाठवड्याच्या पहिल्या दिवशीही अधिकाऱ्यांची भेट हाेत नाही. यामुळे चाैकशी करण्याची मागणी जैन यांनी केली.
दरम्यान, जैन यांनी माहिती अधिकारान्वये बायाेमेट्रिक थम्ब मशीनची माहिती मिळावी, यासाठी ११ एप्रिल राेजी अर्ज केला. मात्र, त्यांना समाधानकारक माहिती िमळाली नाही. त्यामुळे त्यांनी २५ मे राेजी अन्न अाैषधी प्रशासनाच्या सह अायुक्तांकडे अपील दाखल केले. त्यावर १५ जूनला सुनावणी होऊन निकाल जारी करण्यात अाला. या दस्तऐवजातून अन्न अाैषध प्रशासन कार्यालयातील बायाेमेट्रिक अटेंडन्स मशीनमधील रेकाॅर्ड उपलब्ध नसल्याचे समाेर अाले अाहे.

मशीन नादुरुस्त, रेकाॅर्डही नाही : अपीलअर्जावर सुनावणीच्या वेळी जनमाहिती अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण सादर केले. त्यानुसार बायाेमेट्रिक मशीनमध्ये किती दिवसांसाठीचा साठा साठवला जाताे, याबाबतची माहिती कार्यालयात उपलब्ध नाही. कार्यालयात काेणत्याही नमुन्यामध्ये माहिती साठवलेली नाही. अधिकारी-कर्मचाऱ्यांची मासिक उपस्थितीची छापील माहिती उपलब्ध नाही.बायाेमेट्रिक मशीन नादुरुस्त असून, डाटा वेगळ्या स्टाेअरमध्ये साठवलेला नाही.
अन्न अाैषध प्रशासन कार्यालयातील प्रकार झाला माहिती अधिकारात उघड, मशीन बनली शाेभेची वस्तू

बायाेमेट्रिक मशीन नादुरुस्त; माहिती अनुपलब्ध
^उच्च विद्युतदाबामुळे बायाेमेट्रिक मशीन नादुरुस्त झाली. संबंधित कंपनीला पत्र दिले अाहे. कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन हजेरीची नाेंद सुरू केली अाहे.'' श.म. काेलते, सहायक अायुक्त, अन्न अाैषधी प्रशासन.

मिळालेल्या माहितीत असाही गाेंधळ
माहिती अधिकारान्वये मिळालेल्या माहितीमध्ये प्रचंड गाेंधळ तफावत अाहे. १० मे २०१६ राेजी दिलेल्या माहितीत थम्ब इप्रेशन मशीन ही जानेवारी २०१६ पासून सुरू झाली, असे नमूद करण्यात अाले. मात्र, १५ जून २०१६ राेजी दिलेल्या दस्तऐवजामध्ये मशीन ही १४ डिसेंबर २०१५ राेजी नादुरुस्त झाली, असे नमूद केले अाहे. त्यामुळे मशीन कधीपासून कार्यान्वित झाली कधी नादुुरुस्त झाली, हेच स्पष्ट हाेत नाही.
बातम्या आणखी आहेत...