आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिसेन हत्याकांडातील चारही आरोपींची न्यायालयीन कोठडीत केली रवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जमिनीवर बेकायदेशीररीत्या ताबा मिळवण्याच्या उद्देशाने अंगावर थेट गाडी घालून प्रकाशसिंग बिसेन यांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या चारही आरोपींची पोलिस कोठडी सोमवारी संपली. त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
अकोट रोडवरील चारमोरीजवळील रस्त्यावरील शेतात असलेल्या पोल्ट्री फॉर्मसमोर प्रकाशसिंग बिसेन हे बसले होते. जुलै रोजी सायंकाळी वाजताच्या सुमारास अकोटफैल येथील सलाम खान, विजेंद्र कुरील, इलियास, शेख करीम हे इंडिका कारमधून गेले त्यांनी जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवण्यासाठी प्रकाशसिंग बिसेन यांच्याकडे १० लाख रुपयांची मागणी केली.

मात्र, त्यांनी ती पूर्ण केल्यामुळे त्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जखमी करण्यात आले होते. त्यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते.