आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे धक्कातंत्र; महापौर देशमुख यांच्यासह पाच विद्यमान नगरसेवकांची उमेदवारी रद्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत पुन्हा एकदा धक्का तंत्राचा अवलंब केला. विद्यमान महापौर उज्वला देशमुख यांच्यासह पाच विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारली. भाजपच्या या धक्कातंत्रा बाबत काही प्रभागात नाराजी व्यक्त केली जात आहे. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या अधिक होती. त्यामुळे बंडखोरीची शक्यताही भाजपमध्ये अधिक होती. त्यामुळे उमेदवारी कोणाला? ही बाब भाजपने गुपीत ठेवली. बंडखोरांना कोणतीही संधी मिळू नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली. महापौरांनी प्रारंभी उमेदवारीच मागीतली नव्हती. मात्र त्या नंतर उमेदवारीसाठी त्यांनी प्रयत्न केले. तर इतर विद्यमान नगरेसवकांपैकी किती जणांना उमेदवारी नाकारली जाणार ? याबाबत उत्सुकता होती. ही उत्सुकता आता संपुष्टात आली. 

भाजपने विद्यमान महापौर उज्वला देशमुख, गोपी ठाकरे, योगेश गोतमारे, कल्पना गावंडे आणी नम्रता मोहोड या पाच जणांना उमेदवारी नाकारली. यात गोपी ठाकरे यांना उमेदवारी का नाकारली? याबाबत शहरात तर्क-वितर्क लढवले जात होते. २०१२ च्या निवडणुकीत गोपी ठाकरे यांना भाजपने उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे गोपी ठाकरे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. भाजपचे खासदार, आमदारांनी गोपी ठाकरे यांच्या विरोधात शड्डु ठोकला होता. मात्र गोपी ठाकरे मोठ्या मताधिक्क्याने निवडुन आले होते. त्या नंतर गोपी ठाकरे परत स्वगृही भाजपमध्ये परत आले होते. 

त्यामुळे या निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र भाजपने पुन्हा धक्का तंत्राचा वापर करुन गोपी ठाकरे यांना उमेदवारी नाकारली. यामुळे या प्रभागात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या नाराजीचा फटका भाजपला बसुन गोपी ठाकरे पुन्हा विजयी होणार का? याबाबत आतापासूनच उत्सुकता लागली आहे. 
बातम्या आणखी आहेत...