आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपूर्ण शेतमाल खरेदी करणार, मुख्‍यमंत्र्यांनी मागण्‍या केल्‍या मंजूर; यशवंत सिन्‍हांचे आंदोलन मागे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ममता बॅनर्जी यांनी मोबाइलवर यशवंत सिन्हा यांच्याशी संवाद साधला. - Divya Marathi
ममता बॅनर्जी यांनी मोबाइलवर यशवंत सिन्हा यांच्याशी संवाद साधला.

अकाेला- शेतकऱ्यांच्या अार्थिक उन्नतीसाठी शेतकरी जागर मंचने माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेले आंदोलन बुधवारी मागण्या मान्य झाल्यानंतर थांबवण्यात आले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागण्या मान्य केल्याची घाेषणा  सिन्हा यांनी शेतकऱ्यांसमाेर केली. त्यामुळे शेतकऱ्यांकडे असलेल्या सर्व शेतमालाची खरेदी हाेणार असून व्यापाऱ्यांना माल विकलेल्या शेतकऱ्यांना  हमीभावाची  रक्कम मिळण्याचा मार्गही  माेकळा झाला अाहे. याशिवाय, कपाशीच्या नुकसानीपाेटी भरपाई मिळणार असून कृषिपंपांचा वीजप्रवाह खंडित करू नये, अशा सूचना महावितरणला देण्यात येणार अाहेत. याची अंमलबजावणी व्यवस्थित न झाल्यास पुन्हा अांदाेलन छेडण्यात येईल, असाही इशारा  सिन्हा व शेतकऱ्यांनी दिला.


यशवंत सिन्हा यांच्यासह शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केल्यानंतर सोमवारी पोलिसांनी सिन्हा यांना ताब्यात घेत पोलिस मुख्यालयात स्थानबद्ध केले हाेते. शेतकऱ्यांच्या एकूण सहा मागण्यांसाठी तीन दिवसांपासून अांदाेलक व प्रशासनामध्ये चर्चा सुरू होती. बुधवारी सकाळपासून पुन्हा चर्चेला प्रारंभ झाला. प्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व यशवंत सिन्हा  यांच्यात मोबाइलवर चर्चा झाली. 

 

या मागण्या झाल्या मान्य

- बाेंडअळीमुळे कपाशीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून भरपाईसाठी प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवणार.
- शेतकऱ्यांकडे असलेले संपूर्ण मूग, उडीद, साेयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन चित्रीकरणासह पंचनामे  करणार.
- शेतमालाची नियमानुसार खरेदी. मात्र नाफेडकडे अाॅनलाइन अर्ज भरलेल्यांच्या मालाचे पंचनामे केले जातील.
- व्यापाऱ्यांना शेतमाल विकलेल्या शेतकऱ्यांना कागदपत्रे सादर केल्यावर हमीभावातील रकमेचा फरक मिळणार.

- कृषिपंपाची वीजजाेडणी तोडू नये अशी सूचना महावितरणला करणार.
- साेने तारण कर्जमाफीच्या अटींबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. { सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू.

 

अर्थतज्ञांच्या मते शासनाच्या तिजाेरीवर परिणाम नाही

या मागण्या मान्य केल्याने शासनाच्या तिजाेरीवर फारसा परिणाम हाेणार नाही. अर्थसंकल्पामध्ये ही तरतूद केलेली असतेच. यासाठी निधी वळता करावा लागेल, असे येथील शिवाजी महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभागप्रमुख अार. के. शेख यांनी सांगितले.

 

- शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अाकस्मिक निधीतून खर्च भागवता येईल. अर्थसंकल्पामध्येच ही तरतूद असते, असे अर्थतज्ज्ञ डाॅ. संजय खडक्कार म्हणाले. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... असे जुळले अकोल्याशी ऋणानुबंध...बड्या नेत्यांच्या पाठिंब्यानंतर तुषार गांधीही भेटीला

बातम्या आणखी आहेत...