आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी वाटपातील झुकते माप ठरले महाआघाडीत बिघाडीचे कारण?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - जिल्हापरिषद विषय समिती सदस्य निवडीनंतर अाता महाघाडीतच घमासान सुरु झाले अाहे. भाजप सदस्यांना निधी वाटपात झुकते माप मिळाल्याने महाअाघाडीत बिघाडी झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली असून, भारिप-बमंसने खेळलेली राजकीय खेळ महाघाडीच्या मुळावर पडल्याचे राजकीय जाणकारांचे मत अाहे.
अकाेला पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या उमेदवारांना काॅंग्रेस राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सदस्यांनी पाठिंबा दिला हाेता. हीच परिस्थिती जिल्हा परिषदमध्ये सत्ता स्थापनेत कायम राहावी, यासाठी अपक्षांना पुढे करीत भाजप-शिवसेनेने काॅंग्रेसला साेबत घेत महाअाघाडी स्थापन केली हाेती. मात्र अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारिप-बमंसचा विजय झाला हाेता. भारिप-बमसंच्या उमेदवारांना २६,तर महाअाघाडी समर्थित उमेदवारांना २३ मते मिळाली. भारिप-बमसंला स्व:चे २४, एक शिवसेना राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या एका सदस्याने मतदान केले हाेते. अपक्ष सदस्य राजेश खाेने हे गैरहजर हाेते. शिवसेनेचे सदस्य चंद्रशेखर पांडे हे तटस्थ राहिले हाेते. त्यानंतर सभापतीपदाच्या निवडणुकीतही भाजप,शिवसेना, काॅंग्रेस अशी महाअाघाडी कायम हाेती. मात्र दाेन निवडणुकीत पदरात काहीच पडल्याने काॅंग्रेस भाजपने विषय समिती सदस्य पदाच्या निवडणुकीत सावध पवित्रा घेतला.

दरम्यान, १४ सप्टेंबर राेजी पाडलेल्या विषय समिती सदस्याच्या निवडीनंतर अाता भाजप-शिवसेनेतील वाद समाेर येत अाहेत. विषय समिती सददस्य निवडीत शिवसेनेच्या पदारात काहीच पडले नाही. त्यामुळे अाता शिवसेनेला का बाजूला ठेवण्यात अाले, याबाबतची माहिती पुढे येण्यास सुरुवात झाली अाहे. येणाऱ्या काळात दाेन पक्षातील राजकीय संघर्ष काेणते रुप घेताे, हे लवकरच स्पष्ट हाेईल.

^भारिप-बमंस काेणत्याहीपरिस्थितीत दिलेला शब्द पाळताे, हा अामचा अातापर्यंतचा इतिहास अाहे. मात्र जिल्हा परिषद विषय समिती सदस्यबाबत शिवसेनेसाेबत अशा पद्धतीने चर्चा झाली नव्हती. सर्वसाधारण सभेत निवडीच्या वेळी शिवसेनेचे प्रमुख नेते सभागृहातच उपस्थित नव्हते. ’’ दामाेदरजगताप, गट नेता, भारिप-बमंस, जिल्हा परिषद.

^विषय समितीसदस्य निवडीची प्रक्रिया सामजस्याने पूर्ण करु, असा शब्द भारिप-बमसंच्या नेत्यांनी दिला हाेता. २९ जुलै राेजी झालेल्या सभेपूर्वी दाखल अर्जाच्या अाधारे निवड प्रक्रिया पार पाडण्यात येईल, असेही सांगितले हाेते. भारिप-बमंसव भाजपने पदाच्या लालसे पाेटी ही प्रक्रिया राबवली. या निवड प्रक्रियेला वरिष्ठांकडे अाव्हान देण्यात येईल.’’ ज्याेत्सनाचाेरे, गट नेत्या, शिवसेना, जि.प.

^भाजपच्या मूर्तिजापूरमधील सदस्याला समितीमध्ये स्थान मिळण्यासाठी प्रयत्न केले. विषय समिती निवडीवरून शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद हाेते. निवडीच्या वेळी शिवसेनेचे माेठे नेते सभागृहातच नव्हते. निवडीचा निधी वाटपाशी संबंध नाही. भाजपचा सत्ताधाऱ्यांना विधायक कामांना पाठिंबाच राहिल. मात्र चुकीचे काम झाल्यास विराेधही करण्यात येईल.’’ रमणजैन, विराेधी पक्ष नेता, भाजप ,जि.प.

...तर बिघाडी भारिप-बमसंच्या पथ्यावर
जिल्हा परिषदेमध्ये सत्ताधारी भारिप-बमंससमाेर महाघाडीच्या रुपाने तगडा विराेधी पक्ष उभा राहिला अाहे. मात्र अाता विषय समितीवरुन शिवसेना-भाजपमधील दरी वाढण्याची शक्यता अाहे. १४ सप्टेंबर राेजी झालेल्या सर्व साधारण सभेत तर भाजपच्या सदस्यांनी कामकाज सुरुळीत झाल्याबद्दल सभागृहातच समाधान व्यक्त केले हाेते. तसेच शिवसेनेच्या सदस्याने अर्ज मागे घ्यावा, यासाठी भाजप सदस्यांनी पुढाकार घेतला हाेता. त्यामुळे उर्वरित कार्यकाळात भारिप-बमसंच्या खेळीला असेच यश अाल्यास ते पक्षाच्या पथ्यावर पडणारे ठरणार अाहे, असे जाणकारांचे म्हणणे अाहे.

भारिप-बमसंमधील ज्येष्ठांनाही शह
साेशल इंजिनिअरींगमुळे भारिप-बमंसमधील काही ज्येष्ठ सदस्यांना अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती पदापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे फायदेशीर ठरणाऱ्या विषय समितीत स्थान मिळावे, यासाठी या ज्येष्ठांनी ‘फिल्डींग’ लावली. यासाठी त्यांनी प्रथम सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्यासाठी अध्यक्षांना पत्र दिले. मात्र प्रशासनाने नियमावर बाेट ठेवून सत्ताधाऱ्यांची मागणी धुडकावली. त्यानंतर १४ सप्टेंबर राेजी झालेल्या सभेपूर्वी एक पद रिक्त असलेल्या स्थायी समिती सदस्य पदासाठी रस्सीखेच झाली हाेती. एका सदस्याने तर थेट टाेकाची भूमिका घेतल्याने ज्येष्ठांना एक पाऊल मागे घेतल्याचे समजते.

स्थायी समितीसाठी लागली ‘फिल्डिंग’ : भारिप-बमंस,काॅंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी कांग्रेसच्या सदस्यांमध्ये बंदद्वार चर्चा झाली हाेती. दुपारी वाजता सुरु हाेणारी सभा वाजून ४० मिनिटांनी सुरु झाली. स्थायी समितीसाठी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा िज.प.सदस्य नितीन देशमुख हे इच्छुक हाेते. मात्र अध्यक्ष-उपाध्यक्ष सभापतीच्या पदाची निवडणुकीसाठी देशमुख यांनी महाघाडीची माेट बांधण्यात मुख्य भूमिका बजावली हाेती. त्यामुळे भारिप-बमसंने देशमुख यांना स्थायी समितीमध्ये स्थान मिळू नये, यासाठी कंबर कसली हाेती. अखेर काॅंग्रेस, भाजपच्या सदस्यांना समितीमध्ये स्थान मिळाले.

^शिवसेनेमध्ये अजिबातअंतर्गत वाद नाहीत. विषय समिती निवडणुकीसाठी विराेधी पक्ष नेत्यांनी महाघाडीतील सर्वच घटक पक्षांच्या प्रमुखांशी चर्चा करणे अावश्यक हाेते. अाता २९ जुलै राेजी झालेल्या सभेत विषय समिती सदस्य निवडीसाठी दाखल केलेल्या अर्जांचे काय झाले, याबाबत वरिष्ठांकडे दाद मागू.'' नितीन देशमुख, जि.प.सदस्य, तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख.
बातम्या आणखी आहेत...