आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप आमदाराची \'ती\' ऑडिओ क्लीप व्हायरल; सर्वात आधी \'दिव्य मराठी\'कडे केला खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर्णी- यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी-केळापूर विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार राजु तोडसाम यांनी शासकीय कंत्राटदाराला खंडणी मागितल्याचे प्रकरण समोर आले आहे. यासंदर्भात आमदार व कंत्राटदारांमध्ये झालेली ऑडीओ क्‍लिप व्हायरल झाली आहे. या कंत्राटदाराने वडगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. (पुढील स्लाइडवर ऑडिओ क्लिप)

आमदार तोडसाम यांनी सर्वात आधी दैनिक 'दिव्य मराठी'कडे खुलासा
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी-केळापूर विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार राजु तोडसाम यांनी शासकीय कंत्राटदार शिवदत्त शर्मा यांनी केलेल्या आरोपावर सर्वात आधी दैनिक 'दिव्य मराठी'कडे खुलासा केला आहे.  कंत्राटदारांनी केलेले आरोप अामदार तोडसाम यांनी फेटाळले आहेत.

काय आहे हे प्रकरण?
यवतमाळ येथील कंत्राटदार एस.एल. शर्मा यांनी तोडसाम यांच्या आर्णी मतदारसंघात रस्त्यांची कामे केली आहेत. या कामाची काही बिले निघाली आहेत. काही बिले निघालेली नाहीत. त्यापूर्वी आमदार तोडसाम यांनी शर्मा यांना फोन केला. जवळपास पाच मिनिटे या दोघांमध्ये संभाषण झाले.

5 टक्‍क्‍यांची मागणी
आमदार राजू तोडसाम यांनी आपल्याला 5 टक्के रक्‍कमेची मागणी केली होती, असा आरोप एस. एल. शर्मा यांनी केला आहे. यासंदर्भात ते म्हणाले, "त्यांच्या मतदारसंघात एकूण 80 लाख रुपयांचे काम मला मिळाले होते. ते काम मी टेंडर रक्कमेपेक्षा कमी दरात घेतले आहे. त्यामुळे एवढी रक्कम देऊ शकत नाही. माझा मुलगा पुण्यात उपचार घेत आहे. ' तो कोमात आहे, तरीही या आमदाराला कोणताही पाझर फुटला नाही माझ्याकडे ते पैशाची मागणी करीत आहेत अशी तक्रार ठेकेदार एस. एल. शर्मा यांनी केली आहे.

दरम्यान, राजू तोडसाम आर्णी मतदारसंघातून निवडून आले असून त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांचा पराभव केला होता. तोडसाम पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आले आहेत. या प्रकरणावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शासकीय कंत्राटदार शिवदत्त शर्मा यांनी केलेल्या आरोपावर काय म्हणाले आमदार तोडसाम? व्हि‍डिओ पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...