आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला: जिल्हाधिकारी बंगल्यासमोर 'काळी दिवाळी'; शेतकरी जागर मंचच्या कार्यकर्त्यांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जिल्हाधिकारी बंगल्यासमोर उपोषण करून काळी दिवाळी साजरी करणाऱ्या शेतकरी जागर मंचच्या शेतकरी कार्यकर्त्यांना आज (गुरुवार) सकाळी  पोलिसांनी अटक केली.

शेतकऱ्यांच्या 'सोयाबीन बोनस'चे 7 कोटी देण्यात यावे, कीटकनाशक बळीची चौकशी विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) करण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, या मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाने आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळी थेट जिल्हाधिकर्‍यांच्या बंगल्यावर धाव घेतली. काळे कंदील, काळे कपडे परिधान करीत शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा घोषणाबाजी करीत निषेध केला.

जिल्हाधिकार्‍यांकडून पोलिसांना मिठाई..
एकीकडे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढाणाऱ्या शेतकरी जागर मंचचा कार्यकर्ताना पोलिस बळाचा वापर करुन ताब्यात घेत होते तर दुसरीकडे जिल्हाधिकारी यांच्या बंगल्यावर पोलिसांना मिठाई दिली जात होती. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा होता.
बातम्या आणखी आहेत...